कामठी रोडवर गृहप्रकल्पात गुंतवणुकीची संधी

By Admin | Updated: January 7, 2017 02:53 IST2017-01-07T02:53:45+5:302017-01-07T02:53:45+5:30

वर्धा रोड वा अमरावती रोडच्या तुलनेत कामठी मार्गावर शासनाचे अनेक प्रकल्प आणि विकासात्मक कामे सुरू आहेत.

Opportunity for investment in Homeworld on Kamathi Road | कामठी रोडवर गृहप्रकल्पात गुंतवणुकीची संधी

कामठी रोडवर गृहप्रकल्पात गुंतवणुकीची संधी

शासनाचे विविध प्रकल्प : फ्लॅटचे किफायत दर
नागपूर : वर्धा रोड वा अमरावती रोडच्या तुलनेत कामठी मार्गावर शासनाचे अनेक प्रकल्प आणि विकासात्मक कामे सुरू आहेत. रविवारी वांजरी येथे शासनाच्या किफायत हाऊसिंग योजनेत १००० फ्लॅट उभारणीचे उद्घाटन मुख्यमंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी झाले. याशिवाय उड्डाण पूल आणि मेट्रो रेल्वेमुळे कामठी रोड वर्दळीचा झाला असून फ्लॅट वा प्लॉट खरेदीसाठी हीच योग्य वेळ असल्याचे बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.
१८ कि़मी.चा आठ पदरी रस्ता
विकासाच्या दृष्टीने सरकार कामठी रोडवर फोकस करीत आहे. त्याचे श्रेय नितीन गडकरी यांना जाते. भारतीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) कडबी चौक ते कन्हानपर्यंत १८ कि़मी. लांबीचा आठ पदरी रस्ता तयार करीत आहे. त्याचे उद्घाटनही झाले आहे. याशिवाय रिझर्व्ह बँक ते सदर आणि एलआयसी चौक ते कडबी चौकापर्यंत उड्डाण पूल तयार होणार आहे. वाहनचालकाला कडबी चौकापासून थेट आॅटोमोटिव्ह चौकापर्यंत सुलभरीत्या जाता येणार आहे. गडकरी यांनी दोन दिवसांपूर्वी मेट्रो रेल्वे कामठीपर्यंत नेण्याची घोषणा केली आहे. या मार्गावर आंतरराष्ट्रीय शाळा, हॉस्पिटल आणि बाजारपेठा आहेत. डॉ. अजय मेहता यांचे कॅन्सर हॉस्पिटल वांजरी येथे सुरू होणार आहे. वर्धा रोड आणि अमरावती रोडपेक्षा कामठी मार्गावरील प्रॉपर्टी दर २० ते ३० टक्के कमी आहेत. वर्धा रोडवर अनेक निवासी प्रकल्प आहेत. पण तिथे कुणीही राहायला जात नाही.
पण कामठी रोडवर दाट लोकवस्ती असल्यामुळे निवासाचा फायदा आहे. उड्डाण पुलामुळे वाहनचालकाला सदरपासून पाच ते सात मिनिटात कुठेही पोहोचता येते.(प्रतिनिधी)

बँकांच्या व्याजदरात कपात
बँकांनी गृहकर्जावरील व्याजदरात कपात केली आहे. वर्षभरात १.२ टक्के व्याजदर कमी झाले आहेत. सध्या व्याजदर परवडणारे असून काही महिन्यात ७.५ टक्क्यांवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ईएमआय कमी येणार आहे. प्रॉपर्टी खरेदीची हीच योग्य वेळ आहे. सरकार पायाभूत सुविधांवर जास्त भर देत असल्यामुळे लोकांना फायदाच होणार आहे.

Web Title: Opportunity for investment in Homeworld on Kamathi Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.