शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

विरोधकांनी किमान समान कार्यक्रम ठरवावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 00:47 IST

सर्व विरोधी पक्ष भाजपा विरोधात एकत्र आले तर चित्र बदलू शकते हे पोटनिवडणुकीच्या निकालाने दाखवून दिले आहे. राज्यात बसपासह प्रकाश आंबेडकर यांची भारिप, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस यासह समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा सकारात्मक विचार आम्ही आधीच मांडला आहे. याला सहकारी पक्षांकडून प्रतिसाद आला तर पुढे जाता येईल. आता सर्व विरोधी पक्षांची एकत्र बसण्याची प्रक्रिया सुरु व्हावी. त्यासाठी एक किमान समान कार्यक्रम ठरवावा, असे मत व्यक्त करीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी पुन्हा एकदा विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन केले.

ठळक मुद्देअशोक चव्हाण : विरोधकांची एकत्र बसण्याची प्रक्रिया सुरू व्हावी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सर्व विरोधी पक्ष भाजपा विरोधात एकत्र आले तर चित्र बदलू शकते हे पोटनिवडणुकीच्या निकालाने दाखवून दिले आहे. राज्यात बसपासह प्रकाश आंबेडकर यांची भारिप, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस यासह समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा सकारात्मक विचार आम्ही आधीच मांडला आहे. याला सहकारी पक्षांकडून प्रतिसाद आला तर पुढे जाता येईल. आता सर्व विरोधी पक्षांची एकत्र बसण्याची प्रक्रिया सुरु व्हावी. त्यासाठी एक किमान समान कार्यक्रम ठरवावा, असे मत व्यक्त करीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी पुन्हा एकदा विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन केले.अ.भा काँग्रेस समितीचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी नागभीड तालुक्यातील नांदेड या गावी जाऊन धानाच्या एचएमटी वाणाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण होते. नागपुरात परतल्यावर चव्हाण पत्रकारांशी बोलताना म्हणाले, विरोधकांच्या मत विभाजनाचा भाजपाला थेट फायदा होतो. पालघरच्या निवडणुकीत तसेच झाले. भाजपाला फक्त ३० टक्के मते मिळाली. उर्वरित ७० टक्के मते विरोधी पक्षाला मिळाली. येथे विरोधक एकत्र आले असते तर पालघरचेही चित्र वेगळे असते. भाजपा विरोधी लढा उभारण्याची काँग्रेसची इच्छा आहे. तसे पाऊलही पुढे टाकले आहे. आता इतरांनी त्याला प्रतिसाद देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.भाजपा चार वर्षे सत्तेत मग्न राहिली. त्यामुळे त्यांचा जनतेशी संपर्कच तुटला. त्यामुळेच आता त्यांनी समर्थनासाठी संपर्क अभियान सुरू केले आहे. भाजपा नेते सेलिब्रेटींना भेटत आहेत तर आमचे नेते राहुल गांधी हे सामान्य माणसाला, दादाजी खोब्रागडे यांच्यासारख्या संशोधकाच्या कुटुंबाला भेट देत आहेत. आमच्यासाठी सामान्य माणूस हाच सेलिब्रेटी आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.सप्टेंबरपासून महाराष्ट्र दौरा प्रदेश काँग्रेसतर्फे राज्यातील बहुतांश जिल्ह्यात शिबिरे घेण्यात आली आहेत. पक्षाचे संघटनात्मक काम जोरात सुरू आहे. पावसाळ्याचे दिवस संपले की सप्टेंबरपासून महाराष्ट्र दौरा सुरू केला जाईल व भाजपा विरोधात आवाज बुलंद केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.लोकसभेत यश मिळणार गेल्यावेळी आघाडी सरकार विरोधात वातावरण तयार झाले होते. त्यात मोदींच्या भपकेबाज भाषणांची भर पडली. जनता खोट्या आमिषाला बळी पडली. आता जनता जागी झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे चित्र एकदम बदललेले दिसेल, असा दावा त्यांनी केला.मतपत्रिकेने निवडणुका घ्या ईव्हीएमच्या वापरावर सुरुवातीपासून शंका घेतली जात आहे. व्हीव्हीपॅट लावल्यानंतरही संभ्रम कायम आहे. उन्हामुळे ईव्हीएम बंद पडल्याचे कारण देण्यात आले. २०१४ ची लोकसभा निवडणूक उन्हाळ्यातच झाली होती. तेव्हा मशीन बंद पडल्या नाहीत. काँग्रेसने ईव्हीएम विरोधात ठराव घेतला आहे. शरद पवारांसह इतर पक्षांनीही जाहीर विरोध दर्शविला आहे. मशीनमुळे निर्माण झालेला संभ्रम दूर करून पारदर्शकता आणण्यासाठी मतपत्रिकेने निवडणुका घ्याव्या, अशी मागणी चव्हाण यांनी केली.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेस