शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
2
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
3
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
4
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
5
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
6
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
7
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
8
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
9
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
10
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
11
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
12
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
13
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
14
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
15
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
16
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
17
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
18
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
19
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
20
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश

विरोधकच घामाघूम! नागपुरातील उकाडा असह्य, व्यंगचित्रांतून मांडला सरकारचा ‘दुर्भाग्य योग’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 06:17 IST

विधिमंडळ अधिवेशनात विरोधकांच्या हल्ल्याने सत्ताधारी घामाघूम होण्याची परंपरा आहे. मात्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये आयोजित करून सत्ताधारी भाजपाने विरोधकांना अक्षरश: घामाघूम केले.

नागपूर : विधिमंडळ अधिवेशनात विरोधकांच्या हल्ल्याने सत्ताधारी घामाघूम होण्याची परंपरा आहे. मात्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये आयोजित करून सत्ताधारी भाजपाने विरोधकांना अक्षरश: घामाघूम केले. विरोधी पक्षांची चहापानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा करणारी पत्रकार परिषद लांबताच काहिलीने कावलेल्या पत्रकारांनी आता बस्स करा, असे सांगत चक्क विरोधी पक्षनेतेद्वय राधाकृष्ण विखे पाटील व धनंजय मुंडे यांना रोखले.विरोधकांच्या पत्रकार परिषदेकरिता विरोधी पक्षनेत्याच्या रविभवन येथील निवासस्थानी व्यंगचित्रांची नेपथ्यरचना केली होती. शिवसेनेच्या सत्ता सोडण्याच्या धमक्यांपासून शेतकरी कर्जमाफीपर्यंत आणि फिटनेस चॅलेंजपासून मंत्र्यांच्या क्लिन चीटपर्यंत अनेक बाबींची रेवडी उडवली होती. विरोधी पक्षनेत्यांच्या मागील बाजूस असलेल्या पोस्टरवर शेतकरी कर्जमाफीच्या लाभार्थींची संख्या कमी करण्यावरून आणि पीककर्ज वितरणामुळे होणाऱ्या आत्महत्यांचे वास्तव अधोरेखित करून सरकारला लक्ष्य केले होते. फिटनेस चॅलेंजऐवजी ‘फिसकटलेले’ सरकार अशी शब्दरचना केली होती. रोजगार, महागाई, स्मार्ट सिटी यावरही कुंचल्याचे फटकारे दिले होते. नाणारवरून आणि सत्ता सोडण्याच्या वल्गनांवरून शिवसेनेला चिमटे काढले होते.विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपले म्हणणे मांडले तेव्हा जवळपास सर्व पत्रकार घाम पुसत पुसत बातम्यांचे टिपण घेत होते. त्यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपले म्हणणे मांडायला सुरुवात केल्यावर तर उकाडा असह्य झाल्याने काही पत्रकारांनी चक्क नोटपॅडने वारा घ्यायला सुरुवात केली. तिकडे समोर बसलेले विरोधी नेतेही घामाघूम झाल्याने एक-दोन नेत्यांनी पत्रकार परिषद सुुरू असताना काढता पाय घेतला.मुंÞडे यांनी प्रारंभीच पावसाळ्यात येथे अधिवेशन घेण्याचे कारण काय, असा सवाल केला. नागपूरमध्ये आणखी अधिवेशन घ्यायला आमची हरकत नाही. पण पावसाळ्यात अधिवेशन घेण्याचे कारण तर कळू द्या, असे ते म्हणाले. तब्बल पाऊण-एक तास झाला तरी पत्रकार परिषद न संपल्याने एक-दोन पत्रकारांच्या सहनशीलतेचा कडेलोट होऊन त्यांनी आता आवरा, असा पवित्रा घेतला. दोन-चार प्रश्नानंतर घामाघूम पत्रकारांनी सुटकेचा नि:श्वास टाकला तर विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही घाम पुसत दिलगिरी व्यक्त केली.

टॅग्स :nagpurनागपूर