शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

गुन्हेगारांच्या सफायासाठी ‘आॅपरेशन वाईप आऊट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 10:17 IST

उपराजधानीतील गुन्हेगारीचा सफाया करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी मंगळवारी कर्तव्यकठोर पवित्रा घेतला.

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांचा कर्तव्यकठोर पवित्रासात दिवसाचा अल्टिमेटमअवैध धंदे बंद न झाल्यास ठाणेदारावर कारवाईआयुक्तांच्या आदेशाने खळबळ

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीतील गुन्हेगारीचा सफाया करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी मंगळवारी कर्तव्यकठोर पवित्रा घेतला. त्यांनी अवैध धंदे करणारे, गुन्हेगार आणि त्यांना पाठीशी घालून खाबूगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडवून देणारा आदेश जारी केला. सात दिवसात तुमच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालणारे सर्व अवैध धंदे बंद करा. त्यासाठी अवैध धंदे चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करा. आठव्या दिवशी ज्या कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदा सुरू दिसेल, त्या पोलीस ठाण्यातील ठाणेदारावरही कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात नमूद केले आहे. पोलीस आयुक्तांनी या आदेशाला ‘आॅपरेशन वाईप आऊट‘ असे नाव दिले आहे. आज सायंकाळी जारी झालेले हे आदेश शहरातील एखाद-दोन वगळता सर्वच पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ निर्माण करणारे ठरले आहे. गुन्हेगारीचे मूळ अवैध धंद्यात आहे. गुन्हेगार अवैध दारू विक्री, जुगार अड्डा, मटका अड्डा, चोरीच्या मालाची विक्री, वेश्याव्यवसाय, अवैध सावकारी, खंडणी वसुली करतात. यातून मोठी रक्कम मिळवून गुन्हेगार आपली आर्थिक स्थिती मजबूत करतात. सोबतच या अवैध धंद्यात झोपडपट्टीतील गरिबांच्या मुलांना गुंतवून त्यांनाही गुन्हेगारीत सहभागी करून घेतात. सराईत गुन्हेगार या अल्पवयीन आणि गरीब मुलांकडून अवैध धंदे करवून घेत त्यांना बालवयातच गुन्हेगारीचे धडे देतात. मोठी रक्कम हाताशी असल्यामुळे गुन्हे करताना सापडले तर ते पैशाच्या जोरावर चांगले वकील उभे करून कायद्यातून पळवाटा काढत स्वत:ची सोडवणूक करून घेतात. अशा प्रकारे अवैध धंदे, गुन्हेगारी करूनही त्याचे काही बिघडत नाही, असा वाईट मेसेज गुन्हेगारीच्या वाटेवर असलेल्यांमध्ये जातो. त्यामुळे दुसऱ्या गुन्हेगारांचीही हिंमत वाढते. परिणामी तेदेखील मोठे गुन्हे करतात. त्यामुळे गुन्ह्यांसोबत गुन्हेगारांचीही संख्या वाढते. त्याचा सरळ परिणाम कायदा आणि सुव्यवस्थेची घडी बिघडविण्यावर होतो. शहरात गुन्हेगारी वाढल्याची ओरड होते. त्यातून सर्वसामान्य नागरिक अस्वस्थ होतात आणि पोलिसांचीही प्रतिमा मलीन होते. अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाल्याने आणि गुन्हेगारी उफाळल्याने संबंधित शहराबद्दल बाहेरच्या व्यक्तींमध्येही असुरक्षिततेची भावना निर्माण होते. हा एकूणच प्रकार शहराच्या आणि शहरातील नागरिकांच्या हिताला बाधा पोहोचविणारा आहे. ते लक्षात घेऊन शहरातील सर्वच्यासर्व अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी यापूर्वी वारंवार ठाणेदारांना सूचना केल्या आहेत. तरीसुद्धा एखाद दोन वगळता प्रत्येकच पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्याची आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर, शहरातील सर्व पोलीस उपायुक्त, सर्व सहायक आयुक्त आणि सर्व ठाणेदारांना एक सूचनावजा आदेश जारी केला आहे. आॅपरेशन हाईप आऊटअंतर्गत जारी झालेल्या या आदेशात ३ आॅक्टोबर ते १० आॅक्टोबर या सात दिवसात तुमच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व अवैध धंदे बंद झाले पाहिजे. ११ आॅक्टोबरपासून धडक मोहीम हाती घेतली जाईल. ज्या कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारू गाळणे, विकणे, दारूची वाहतूक करणे, सट्टा-मटका अड्डा, जुगार अड्डा अथवा बुकी आढळल्यास त्या गुन्हेगारासोबतच संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकाºयावर कारवाई केली जाईल.मुळावरच घाव घालायचायवरवरची कमाई नको आहे. गुन्हेगारीचे मूळ अवैध धंद्यात आहे. अवैध धंद्यांमुळेच गुन्हेगार गब्बर बनतात. त्यामुळे गुन्हेगारी ठेचून काढण्यासाठी मुळावरच घाव घालण्याची गरज आहे. ते लक्षआत घेऊनच आॅपरेशन वाईप आऊट हाती घेण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया या निमित्ताने पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी लोकमतशी बोलताना दिली.

टॅग्स :Bhushan Kumarभुषण कुमारNagpur Policeनागपूर पोलीस