शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

ऑपरेशन नन्हे फरिश्ते : मुंबईतील हरवलेला शाळकरी मुलगा नागपुरात आढळला

By नरेश डोंगरे | Updated: July 22, 2025 19:44 IST

Nagpur : रेल्वे स्थानकावर आरपीएफची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबईत अपहरणाचा गुन्हा दाखल असलेल्या शाळकरी मुलाला रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांनी नागपूर स्थानकावर ताब्यात घेतले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सोमवारी सायंकाळी या मुलाला त्याच्या वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.

येथील आरपीएफला शनिवारी रात्री ठाणे, मुंबई पोलिसांकडून ११ वर्षीय मुलाची सचित्र माहिती मिळाली होती. एपीएमसी पोलिस स्टेशन मुंबई येथे या मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल असून तो नागपूरकडे जाणाऱ्या गाडीत असण्याची शक्यताही मुंबई पोलिसांनी वर्तविली होती. त्यानुसार, रविवारी दुपारी नागपूर रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर असलेले आरपीएफचे एएसआय बी.के. सरपटे आणि अंमलदार पिंटू कुमार यांना फलाट क्रमांक तीनवर एक मुलगा सैरभैर अवस्थेत दिसला. त्याची ती अवस्था बघून सरपटे आणि पिंटूने त्याला जवळ घेतले. त्याची आस्थेने विचारपूस केली. त्यानंतर तो मुलगा बोलू लागला. त्याने सांगितल्याप्रमाणे, पीयूष (वय ११ वर्षे, नाव काल्पनिक, रा. मुंबई) नेहमीप्रमाणे शनिवारी दुपारी तो खेळण्यासाठी घराबाहेर पडला. अचानक दोघांनी त्याच्या चेहऱ्यावर कपडा टाकून त्याला बेशुद्ध केले. नंतर त्याला जेव्हा शुद्ध आली तेव्हा तो ठाणे रेल्वे स्थानकावर एका ट्रेनमध्ये होता. भीतीमुळे तो तसाच बसून राहिला आणि नंतर रविवारी तो नागपूर स्थानकावर पोहोचला. आपल्याला कुटुंबीयांची आठवण येत असून आई-वडिलांकडे जायचे आहे, असेही त्याने आरपीएफच्या जवानांना सांगितले. दरम्यान, मुंबई पोलिसांकडून अपहृत मुलाची माहिती मिळाली होती, तो हाच मुलगा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे स्थानिक आरपीएफने ही माहिती मुंबई पोलिस तसेच चाईल्ड लाईनला कळविली. त्यानंतर त्याला शासकीय बालसुधारगृहात पाठविण्यात आले.

पालकांसह पोलिसही पोहोचले

अपहृत मुलगा नागपुरात मिळाल्याचे आणि तो सुखरूप असल्याचे कळताच पीयूषचे पालक आणि मुंबई पोलिस सोमवारी दुपारी नागपुरात पोहचले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पीयूषला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर सोमवारी सायंकाळी पीयूष त्याच्या पालकांसह मुंबईकडे रवाना झाला.

ऑपरेशन नन्हे फरिश्तेअपहरण झालेल्या किंवा घरून वेगवेगळ्या कारणांमुळे पळून गेलेल्या लहान मुलांना हेरून त्यांना चाईल्ड लाईनच्या मदतीने सुखरूप त्यांच्या पालकांकडे सोपविण्याची कामगिरी आरपीएफकडून बजावली जाते. त्यासाठी आरपीएफकडून देशभर 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' नावाने एक सामाजिक उपक्रम राबविला जातो. रविवारी याच उपक्रमांतर्गत आरपीएफने अपहृत पीयूषची सुखरूप घरवापसी केली.

टॅग्स :Missingबेपत्ता होणंCrime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर