शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

नागपूर-सोलापूर शिवशाही एसी स्लिपर बसचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 23:04 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी बुधवारपासून नागपूर-सोलापूर-नागपूर शिवशाही वातानुकुलित स्लिपर बससेवा सुरु केली आहे.

ठळक मुद्देप्रवाशांसाठी सुविधा : आॅनलाईन आरक्षण उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी बुधवारपासून नागपूर-सोलापूर-नागपूर शिवशाही वातानुकुलित स्लिपर बससेवा सुरु केली आहे.प्रवाशांना दैनंदिन वाहतूक सेवा देत असताना खासगी प्रवासी वाहतुकीच्या स्पर्धेत उतरण्यासाठी आणि प्रवाशांना आरामदायी सुखकर सेवा देण्यासाठी एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत नागपूर-सोलापूर-नागपूर शिवशाही वातानुकूलित स्लिपर बससेवेची सुरुवात बुधवार २६ सप्टेबरपासून केली आहे. ही बस गणेशपेठ बसस्थानकावरून दुपारी ४ वाजता सुटणार असून सोलापूरला सकाळी ६.३५ वाजता पोहोचेल. सोलापूरवरून ही बस दुपारी ३ वाजता सुटून नागपूरला सकाळी ५.३५ वाजता पोहोचेल. सदर शिवशाही बसचा मार्ग नागपूर, यवतमाळ, पुसद, नांदेड, सोलापूर असा राहील. प्रवाशांसाठी शिवशाही, शिवनेरी, वातानुकूलित व इतर प्रवासी बसेस सोबतच शिवशाही स्लिपर बसचे आरक्षण महामंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध राहणार आहे. सदर बसच्या शुभारंभ प्रसंगी गणेशपेठ आगाराचे व्यवस्थापक विजय कुडे, बसस्थानक प्रमुख राजेश रामटेके यांनी बसमधील प्रवाशांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी प्रवाशांना मिठाईचे वाटप करण्यात आले. या शिवशाही बसमध्ये आकर्षक डिजिटल बोर्ड, मोबाईल चार्जर, सीसीटीव्ही कॅमेरा, अनाऊन्समेंट सिस्टीम असून प्रवाशांना आरामदायी व सुखकर प्रवासाचा लाभ घेता येणार आहे. या शिवशाही वातानुकूलित स्लिपर बससेवेचा प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन विभाग नियंत्रकांनी केले आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळSolapurसोलापूर