वेळेच्या आतच बंद होते ओपीडी
By Admin | Updated: September 9, 2015 03:04 IST2015-09-09T03:04:42+5:302015-09-09T03:04:42+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयात (मेडिकल) उपचारासाठी येणाऱ्या रु ग्णांची वेदना केंद्रस्थानी ठेवून ...

वेळेच्या आतच बंद होते ओपीडी
मेडिकल : रुग्णांची होत आहे गैरसोय
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयात (मेडिकल) उपचारासाठी येणाऱ्या रु ग्णांची वेदना केंद्रस्थानी ठेवून बाह्यरु ग्ण विभागाच्या (ओपीडी) रु ग्ण तपासणीची वेळ एक तासाने वाढविण्याचा धाडसी निर्णय सहा महिन्यांपूर्वी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी घेतला. मात्र, सकाळी ८ ते दुपारी २ वाजतापर्यंतची वेळ असलेली ओपीडी १.५० वाजताच बंद होत आहे. यामुळे अनेक रुग्णाना उपचाराविना परतावे लागत आहे.
‘लोकमत’ प्रतिनिधीने मंगळवारी याची प्रत्यक्ष पाहणी केली असता मेडिकलचा शल्यक्रिया विभाग, अस्थिरोग विभाग व स्त्री रोग विभाग सोडल्यास इतर बहुसंख्य विभाग वेळेआधीच बंद होत असल्याचे दिसून आले.
मेडिकलमध्ये उपचाराला येणाऱ्या बहुतांश रु ग्णांमध्ये बाहेरगावच्या रु ग्णांचा समावेश असतो. पूर्वी मेडिकलच्या बाह्यरु ग्ण विभागाची सकाळी ८ ते दुपारी १ वाजताची वेळ असायची. अनेक रुग्ण ओपीडी बंद झाल्यावर पोहचायचे. काहींना खाली हात परत जावे लागत होते तर काहींना अपघात विभागाकडे पाठविले जायचे.
त्यामुळे अनेकदा रु ग्णांची गैरसोय व्हायची. किरकोळ आरोग्याच्या तक्र ारीसोबतच या रु ग्णांना पॅथॉलॉजिकल चाचण्यांसाठी सोयीचे होत नव्हते. सोबतच अनेकदा डॉक्टरदेखील ओपीडीत वेळेवर उपस्थित राहात नसल्याने रु ग्णांच्या तपासण्या लांबणीवर पडायच्या. रु ग्णांच्या वेदनेची ही गरज लक्षात घेता अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी हिवाळी अधिवेशनाचेनिमित्त साधून ओपीडीची वेळ तासाभराने वाढविण्याचा निर्णय घेतला.
सुरुवातील मेडिकलमधील सर्व बाह्यरु ग्ण विभाग निर्णयानुसार दुपारी २ वाजतापर्यंत सुरू रहायचे. रुग्णांना हे सोयीचेही होत होते. परंतु आता २ वाजताच्या आधीच विभाग बंद करणे सुरू झाल्याने रुग्ण पुन्हा अडचणीत येत आहे.
मंगळवारी ‘लोकमत’ प्रतिनिधीने ओपीडीला भेट दिली असता येथील रक्त नमुने संकलन केंद्र १.५० वाजता बंद झाले होते. टेबलवर खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. १.५२ वाजता बालरोग विभागाची पाहणी केली असता जागेवर एकही डॉक्टर नव्हते, मात्र लाईट, फॅन, संगणक सुरू होते. १.५४ वाजता औषधवैद्यक शास्त्र विभागाचे दार बंद करण्यात आले होते. सायकॅट्रीक विभागातील डॉक्टर १.४५ वाजताच निघून गेल्याचे येथील महिला कर्मचाऱ्याने सांगितले. (प्रतिनिधी)