खरीप हंगाम तोंडावर, पेरणीपूर्व कामांना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:08 IST2021-06-02T04:08:32+5:302021-06-02T04:08:32+5:30
मोवाड : शेती ही पूर्णत: निसर्गावर अवलंबून असते. लॉकडाऊनचा भार सोसल्यानंतर मोवाड परिसरातील शेतकरी पुन्हा बांधावर सक्रिय झाला आहे. ...

खरीप हंगाम तोंडावर, पेरणीपूर्व कामांना वेग
मोवाड : शेती ही पूर्णत: निसर्गावर अवलंबून असते. लॉकडाऊनचा भार सोसल्यानंतर मोवाड परिसरातील शेतकरी पुन्हा बांधावर सक्रिय झाला आहे. नव्या जामाने खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. मृग नक्षत्राला ७ जूनपासून सुरुवात होत आहे. अशात शेती मशागतीची कामे शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचली आहे. काही शेतकऱ्यांची मशागतीची कामे आटोपली आहेत. यंदा हवामान खात्याने पावसाचा अंदाज चांगला दर्शविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा बळावल्या आहेत. गतवर्षी खरीप व रबी हंगामात शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. सोयाबीन सोंगावे लागले नाही. कपाशीवर बोंड अळी मोठ्या प्रमाणात होती. अवकाळी पावसाने तूर व हरबरा पिकाचे नुकसान केले. संत्री उत्पादकांचेही नुकसान झाले. आंब्या बहराच्या संत्रीला भाव नसल्याने उत्पादनापेक्षा मशागतीचा खर्च जास्त करावा लागला. त्यामुळे यंदा तरी निसर्ग साथ देईल, या आशेने शेतकरी नव्या जोमाने कामाला लागला आहे.
--
पीक कर्जाचे वाटप सुरू आहे. आतापर्यंत जुने नूतनीकरण नियमित असणाऱ्या १५० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना कर्ज वितरित करण्यात आले आहे. यात २० नवीन शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आले आहे.
- नितीन गणवीर, व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया, मोवाड