शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

..तर सरकार स्वामी विवेकानंद स्मारकाचे नियमितीकरण करेल

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: June 28, 2024 19:16 IST

हायकोर्टात प्रतिज्ञापत्र : निर्णय जलशास्त्रीय अभ्यासाच्या अहवालावर अवलंबून

राकेश घानोडेनागपूर : पुणे येथील केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन केंद्राने अंबाझरी तलावापुढील विकास प्रतिबंधित क्षेत्रात बांधण्यात आलेले स्वामी विवेकानंद स्मारक पुरासाठी कारणीभूत ठरणार नाही, असा अहवाल दिल्यास या स्मारकाचे नियमितीकरण करण्यावर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याच्या नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. गोविंदराज गोवडा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आहे. त्यांनी यासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

 

भविष्यामध्ये अंबाझरी तलावातील पाण्यामुळे नागरिकांना पुराचा फटका बसू नये, यासाठी विविध प्रभावी उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे आताच्या बदललेल्या परिस्थितीत स्वामी विवेकानंद स्मारक पुरासाठी कारणीभूत ठरू शकते का, याचा अभ्यास करण्यासाठी महानगरपालिकेने केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन केंद्राची नियुक्ती केली आहे. केंद्राने अभ्यासाकरिता सात महिन्याचा वेळ मागितला आहे. त्यानंतर केंद्राने स्वामी विवेकानंद स्मारक पुरासाठी कारणीभूत ठरू शकते, असा अहवाल दिल्यास हे स्मारक तातडीने हटविले जाईल. अन्यथा राज्य सरकार स्मारकाचे नियमितीकरण करण्यावर निर्णय घेईल, असे डॉ. गोवडा यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. तसेच, केंद्राला जलशास्त्रीय अभ्यास करण्यासाठी आवश्यक मुदत देण्याची विनंती केली आहे.

 

सप्टेंबर-२०२३ मध्ये मुसळधार पाऊस आल्यामुळे अंबाझरी तलावाचे पाणी विविध वस्त्यांमध्ये शिरून हाहाकार माजला होता. परिणामी, रामगोपाल बाचुका व इतर पीडित नागरिकांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून अंबाझरी तलाव व नाग नदी परिसरातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करण्यात यावी, स्वामी विवेकानंद स्मारक हटविण्यात यावे इत्यादी मागण्या केल्या आहेत. न्यायालयाने गेल्या १४ जून रोजी राज्य सरकारला स्वामी विवेकानंद स्मारकाबाबत भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार, हे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टSwami Vivekanandaस्वामी विवेकानंदnagpurनागपूर