अपयश हीच यशाची सुरुवात
By Admin | Updated: May 19, 2016 02:57 IST2016-05-19T02:57:38+5:302016-05-19T02:57:38+5:30
कौशल्य विकास व प्रशिक्षच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. आत्मविश्वास बाळगा,अपयशामुळे खचू नका

अपयश हीच यशाची सुरुवात
राजकुमार बडोले : फॉॅर्च्युन फाऊं डेशनच्या कार्यशाळेचा समारोप
नागपूर : कौशल्य विकास व प्रशिक्षच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. आत्मविश्वास बाळगा,अपयशामुळे खचू नका तर अपयश हीच यशाची सुरुवात असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी बुधवारी केले.
फॉर्च्युन फाऊं डेशनतर्फे एअर डंडिया केबीन क्रू प्री रिक्रुटमेंट संदर्भात एअर इंडियाच्या मार्गदर्शनात शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. बार्टीचे महासंचालक राजेश ढाबरे, भाजपच्या प्रदेश प्रवक्त्या श्वेता शालिनी, फॉर्च्युन फाऊं डेशनचे अध्यक्ष आमदार प्रा.अनिल सोले, संयोजक आमदार डॉ. मिलिंद माने, हेमंत सुटे, आशुतोष नगराळे आदी उपस्थित होते.
युपीएससी परिक्षेत विपरित परिस्थितीवर मात करून अनेकांनी यश प्राप्त केले. एअर डंडिया केबीन क्रू प्री रिक्रुटमेंट परीक्षेत उमेदवारांनाही यश मिळेल. असा आत्मविश्वास निर्माण व्हावा, या हेतुने फॉर्च्युन फाऊं डेशनच्या माध्यमातून तीन दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. प्रशिक्षणामुळे यातील ८५ टक्के उमेदवारांची निवड होईल, असा विश्वास बडोले यांनी व्यक्त केला.
प्रशिक्षणाच्या माध्यमातून उमेदवारांचे आयुष्य घडेल. सोबतच युवक प्रशिक्षित असेल तर आदर्श राज्य निर्माण होईल. या हेतुनेच अशा कार्यशाळा आयोजित करण्यात येत असल्याची माहिती श्वेता शालिनी यांनी दिली.
एअर इंडियात नोकरीच्या संधी आहेत. या परीक्षांची तयारी कशी करावी. गणवेश कसा असावा. व्यक्तिमत्त्व विकास अशा बाबींची उमेदवारांना माहिती व्हावी. या हेतूने फॉर्च्युन फाऊं डेशन व बार्टीच्या माध्यमातून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यात ३०० उमेदवारांनी सहभाग घेतला. यातून अनेकांना एअर इंडियात नोकरीची संधी उपलब्ध होण्याला मदत होईल.
असा विश्वास अनिल सोले यांनी व्यक्त केला. यापूर्वीही बार्टीच्या माध्यमातून फॉर्च्युन फाऊं डेशनतर्फे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यात सहभागी ८० उमेदवारापैकी ४५ उमेदवारांची निवड करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.फॉर्च्युन फाऊं डेशनचा हा स्तुत्य उपक्रम आहे. या प्रशिक्षणाचा युवकांना भविष्यात उपयोग होईल. असा विश्वास राजेश ढाबरे यांनी व्यक्त केला. डॉ. मिलिंद माने, हेमंत सुटे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)