शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

जगावे की मरावे हाच एकच प्रश्न! ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:22 IST

नागपूर : कोरोना संक्रमण आणि टाळेबंदीमुळे, पूर्णत: नाटकांवर उदरनिर्वाह चालविणाऱ्या झाडीपट्टी रंगभूमीवरील कलावंतांमध्ये ‘जगावे की मरावे’ हा प्रश्न होता. ...

नागपूर : कोरोना संक्रमण आणि टाळेबंदीमुळे, पूर्णत: नाटकांवर उदरनिर्वाह चालविणाऱ्या झाडीपट्टी रंगभूमीवरील कलावंतांमध्ये ‘जगावे की मरावे’ हा प्रश्न होता. तो प्रश्न सोडवत राज्य सरकारने दिशानिर्देशांसह नाट्यप्रयोग करण्याची परवानगी दिली खरी. मात्र, ती परवानगी जीवघेणी ठरत आहे. झाडीपट्टी रंगभूमीवर काम करणारे चार कलावंत कोरोना संक्रमित निघाल्याने आयोजकांची व कलावंतांची भंबेरी उडाली आहे.

कोरोना संक्रमणामुळे मरण्याआधी नाट्यप्रयोग झाले नाही तर असेच मरण आहे, असली भावविव्हळ वक्तव्ये नाट्यनिर्माता आणि कलावंतांनी यापूर्वी केली होती. त्यांचे हे वक्तव्य अनेकार्थाने सरकारसाठी आत्मक्लेशाचे ठरणार होते. हे पाप सरकारला नको होते म्हणा वा विविध सांस्कृतिक संघटनांचा हेका म्हणा राज्य सरकारने सांस्कृतिक क्षेत्र तब्बल आठ महिन्यानंतर अनलॉक केले आणि भाऊबीजेपासून झाडीपट्टी रंगभूमीवरील नाट्यप्रयोगांना सुरुवात झाली. एका खुर्चीपासून दुसरी खुर्ची सहा फूट अंतरावर ठेवणे, मास्क आग्रहाने घालणे, व्यक्तिश: अंतर पाळणे, थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझरचा वापर नित्यनेमाने करणे आणि महत्त्वाचे म्हणजे २००च्या वर प्रेक्षक नको, अशा मार्गदर्शिका देण्यात आल्या. मात्र, या मार्गदर्शिकांचे उल्लंघन करणे अगदी पहिल्याच प्रयोगापासून सुरू झाल्याचे दिसून येत आहे. तब्बल दोन-तीन हजार प्रेक्षकांची गर्दी नाट्यप्रयोगाला उसळत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच झाडीपट्टी रंगभूमीवरील तीन निर्माते आणि एक कलावंत कोरोना संक्रमित निघाल्याने खळबळ उडाली आहे. आता या रंगभूमीवरील नाटकांमध्ये काम करणारे ३० ते ४० टक्के कलावंत शहरातून अर्थात नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, पुणे, मुंबई येथून असतात. आणि या शहरांमध्ये कोरोना संक्रमणाची दुसरी लाट आदळली आहे. येथून येणारे कलावंत थेट रंगभूमीवर उतरत आहेत आणि इतर कलावंतांमध्ये मिसळत आहेत. त्याचे दुष्परिणाम आगामी काळात दिसण्याची शक्यता वाढली आहे.

-------------

बॉक्स....

आरोग्य केंद्राच्या नोटिशी धडकल्या

नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे बघून आणि गर्दी प्रचंड वाढत असल्याचे बघून संबंधित तालुक्याच्या आरोग्य केंद्रांनी आयोजकांना धडाघड नोटिशी पाठविण्यास सुरुवात केली आहे. त्याचा परिणाम अनेक नाट्यसंघांचे ठरलेले प्रयोग रद्द झाले आहेत. शहरातील कलावंतांमध्ये त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

----------

बॉक्स...

कुणीच बोलण्यास तयार नाहीत

एरवी आपली मते रोखठोक मांडणारे कलावंत या प्रकरणावर बोलण्यास टाळाटाळ करत आहेत. नाव न सांगण्याच्या अटीवर काही कलावंत आपले मत व्यक्त करत आहेत. सध्या नाटक नकोच करायला. तसेही नाट्यप्रयोग लागत नाहीत. नाट्यप्रयोग झाले नाही तर जगणे अडचणीचे होईल. मात्र, अशा स्थितीत नाट्यप्रयोग झाले तर मरण निश्चित आहे. विशेष म्हणजे, नाट्यप्रयोगामुळे एकापासून अनेकांना संसर्ग होण्याची भीती कलावंत व्यक्त करत आहेत.

.............