शहरं
Join us  
Trending Stories
1
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
2
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
3
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
4
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
5
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
6
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
7
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
8
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
9
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
10
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
11
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
12
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
13
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
14
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
15
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
16
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
17
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
18
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
19
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
20
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
Daily Top 2Weekly Top 5

२४ अभ्यासक्रमाविनाच चालतेय भारतातील एकमेव फायर इंजिनियरींग कॉलेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 11:06 IST

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या एकमात्र ‘फायर कॉलेज’मध्ये २४ अभ्यासक्रम सुरूच झाले नाही. ३१ अभ्यासक्रमांमधून ‘बीई फायर इंजिनीअरिंग (चार वर्षांचा अभ्यासक्रम), ‘डिव्हिजनल आॅफिसर्स’, ‘स्टेशन आॅफिस’ व ‘सब आॅफिसर’ एवढेच अभ्यासक्रम सुरू झाले आहेत.

ठळक मुद्देसंकटाला घेऊन गंभीरतेचा अभावतयारच झाले नाही टेक्निकल ग्राऊंड

वसीम कुरैशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या एकमात्र ‘फायर कॉलेज’मध्ये २४ अभ्यासक्रम सुरूच झाले नाही. ३१ अभ्यासक्रमांमधून ‘बीई फायर इंजिनीअरिंग (चार वर्षांचा अभ्यासक्रम), ‘डिव्हिजनल आॅफिसर्स’, ‘स्टेशन आॅफिस’ व ‘सब आॅफिसर’ एवढेच अभ्यासक्रम सुरू झाले आहेत.संकटकाळी किंवा एखादी दुर्घटना घडल्यास ‘फायर कॉलेज’मध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची किंवा अधिकाऱ्यांची मदत घेतली जाते. परंतु अनेक अभ्यासक्रम सुरूच झाले नाही. अभ्यासक्रम सुरू न झाल्याने १२ शिक्षकांची भरती प्रक्रियाही रखडली आहे. केंद्रीय लोकनिर्माण विभागाच्या (सीपीडब्ल्यूडी) संथगतीच्या कामकाजामुळे फायर कॉलेज परिसरातील टेक्निकल ग्राऊंडही तयार झालेले नाही. विद्यार्थ्यांशी संबंधित समस्यांपेक्षा येथे अधिकाऱ्यांचे कार्यालय व अन्य कामांना प्राथमिकता दिलाी जात असल्याचे चित्र आहे. सूत्रानुसार, एका कॉलेजमध्ये दोन संचालकांचा मुद्दाही समोर आला आहे. समन्वयाच्या अभावामुळे अनेक कार्यही प्रभावित झाल्याचे सांगण्यात येते.

टेबलही मिळत नाहीसूत्रानुसार, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या या कॉलेजमध्ये टेबलही मिळत नाही. इलेक्ट्रिक, इलेक्ट्रिकल आणि फिजिक्स सेक्शनमध्ये तीन टेबलची गरज असताना, ते उपलब्ध करून देण्यात आले नाही.

तर केरळसारखी स्थिती उद्भवणारवाढत्या औद्योगिकीकरण व शहरीकरणामुळे धोकेही वाढत आहेत. यात जर सरकारी धोरणांचा चुकीचा वापर होत असेल किंवा चुकीच्या पद्धतीने अमलात आणले जात असेल तर केरळसारखी स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. अशा संकटाच्या वेळी करण्यात येणाऱ्या उपाययोजनेला घेऊन अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत.-शमीम, संचालक (शैक्षणिक), नॅशनल फायर सर्विसेस कॉलेजकधी काय झाले

  • सुरुवातीला फायर कॉलेज निर्मितीचा खर्च १०३ कोटी रुपये होता.
  • नंतर २०५ कोटी रुपये झाला, २०१० मध्ये प्रस्तावाला मंजुरी मिळाली.
  • २०१३ मध्ये फायर कॉलेज पूर्ण तयार होणार होते.
  • २०१८ मध्ये आतापर्यंत सुरक्षा भिंतीचे काम पूर्ण झाले नाही.
  • सुरक्षा भिंतीचे बांधकाम न झाल्याने समाजविघातक तत्त्व कॉलेजमध्ये शिरतात.
  • चोऱ्या वाढल्या असून, काही ठिकाणी लोखंडी ग्रील चोरीला गेले आहेत.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र