लोकमत इफेक्ट : अत्यावश्यक असेल तरच मिळणार 'कर्फ्यू पास'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 22:39 IST2020-03-28T22:36:55+5:302020-03-28T22:39:28+5:30
शनिवारी केवळ २८० लोकांनाच अत्यावश्यक सेवेसाठीच पासेस वितरित करण्यात आल्या. पोलिसांकडून केवळ अत्यावश्यक शासकीय सेवाशी संबंधित सरकारी कर्मचारी आणि पत्रकारांनाच यातून सूट दिली जात आहे.

लोकमत इफेक्ट : अत्यावश्यक असेल तरच मिळणार 'कर्फ्यू पास'
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाबाबत लोक गंभीर नाहीत. रस्त्यावर येताहेत. मोठ्या प्रमाणावर वाहने फिरत आहेत, अशी ओरड सुरू आहे. ही वस्तुस्थितीही आहे. परंतु शहर पोलिसांनी कर्फ्यू लागू झाल्यापासून चार दिवसात १६ हजार ५५४ पासेस वितरित केल्या आहेत. त्यामुळेसुद्धा शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर लोक वाहनांसह दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर लोकमतने पासेस वाटपाबाबत कठोर धोरण अवलंबिण्यासंदर्भात आज शनिवारच्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेत यापुढे पास वाटताना कडक धोरण अवलंबिण्याचे निर्देश दिले आहेत. शनिवारी याचा परिणामही दिसून आला. शनिवारी केवळ २८० लोकांनाच अत्यावश्यक सेवेसाठीच पासेस वितरित करण्यात आल्या. पोलिसांकडून केवळ अत्यावश्यक शासकीय सेवाशी संबंधित सरकारी कर्मचारी आणि पत्रकारांनाच यातून सूट दिली जात आहे. यासाठीसुद्धा ओळखपत्र आवश्यक आहे. यासोबतच शहरात १४४ लागू असल्याने विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांविरुद्ध १८८ अंतर्गत कारवाई करण्यात आली.
आज शनिवारी करण्यात आलेली कारवाई
डिटेन कारवाई - ६१
आदेशाचे उल्लंघन -३ गुन्हे
पासेस वाटप - २८०