विद्यापीठातर्फे कृष्णा कांबळे यांना ऑनलाईन आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:06 IST2021-04-18T04:06:56+5:302021-04-18T04:06:56+5:30
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कर्करोग विभागाचे माजी विभागप्रमुख व सामाजिक जाणिवेचे डॉक्टर कृष्णा कांबळे यांचे शुक्रवारी ...

विद्यापीठातर्फे कृष्णा कांबळे यांना ऑनलाईन आदरांजली
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कर्करोग विभागाचे माजी विभागप्रमुख व सामाजिक जाणिवेचे डॉक्टर कृष्णा कांबळे यांचे शुक्रवारी आकस्मिक निधन झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पाली प्राकृत व बुद्धिस्ट स्टडी विभागातर्फे शनिवारी त्यांना ऑनलाईन आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. भदंत विमलकीर्ती गुणसिरी होते. नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. पुरण मेश्राम, डॉ आंबेडकर विचारधारा विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. शैलेंद्र लेंडे, पालीचे माजी विभागप्रमुख डॉ. बालचंद्र खांडेकर, डॉ. सुदेश भोवते, डॉ. प्रशांत तांबे, प्रा.डॉ. तुळसा डोंगरे, प्रा. नंदा भगत, रेखा बडोले, महेंद्र कौसल, उत्तम शेवडे आदी सहभागी झाले होते. संचालन पाली व बुद्धिस्ट स्टडी विभागाचे प्रमुख डॉ. नीरज बोधी यांनी केले.