शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

ऑनलाईन व्यवहार : तंत्रज्ञान समजा, अलर्ट रहा, सुरक्षित व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 23:43 IST

मोबाईल हा आजच्या काळात जवळजवळ शरीराचे अंग झाला आहे. मात्र यासोबत सायबर गुन्ह्याचे धोकेही वाढले आहेत. विशेषत: ऑनलाईन व्यवहारात हे धोके कित्येक पटीने वाढले आहेत आणि मानवी चुका या सुरक्षेमध्ये सेंध लावणाऱ्या आहेत. भारतामध्ये तर सायबर सुरक्षेकडे नगण्य लक्ष दिले जाते. पण अशा धोक्यांमुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. काळानुसार तंत्रज्ञानाशी सामंजस्य साधणे गरजेचे आहे. केवळ असे व्यवहार हाताळताना काळजी घेतली व अलर्ट राहून कार्य केल्यास सुरक्षा आपल्या हाती आहे, असे प्रतिपादन आयटी अभ्यासक आणि प्रशिक्षक प्रशांत जोशी यांनी केले.

ठळक मुद्देजनमंच जनसंवादमध्ये आयटी अभ्यासक प्रशांत जोशी यांचे मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोबाईल हा आजच्या काळात जवळजवळ शरीराचे अंग झाला आहे. मात्र यासोबत सायबर गुन्ह्याचे धोकेही वाढले आहेत. विशेषत: ऑनलाईन व्यवहारात हे धोके कित्येक पटीने वाढले आहेत आणि मानवी चुका या सुरक्षेमध्ये सेंध लावणाऱ्या आहेत. भारतामध्ये तर सायबर सुरक्षेकडे नगण्य लक्ष दिले जाते. पण अशा धोक्यांमुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. काळानुसार तंत्रज्ञानाशी सामंजस्य साधणे गरजेचे आहे. केवळ असे व्यवहार हाताळताना काळजी घेतली व अलर्ट राहून कार्य केल्यास सुरक्षा आपल्या हाती आहे, असे प्रतिपादन आयटी अभ्यासक आणि प्रशिक्षक प्रशांत जोशी यांनी केले.जनमंचच्यावतीने आयोजित जनसंवाद कार्यक्रमांतर्गत शनिवारी धनवटे सभागृह, शंकरनगर येथे ‘सुरक्षित ऑनलाईन व्यवहार’ या विषयावर मार्गदर्शक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रशांत जोशी यांनी संगणक हाताळण्यापासून आवश्यक मूलभूत गोष्टी, सुरक्षित उपयोग, नेटबँकिंग, पासवर्ड टीप्स अशा सर्व अंगाने मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, नवनवीन तंत्रज्ञान सातत्याने येत असल्याने नवशिक्यांप्रमाणे तज्ज्ञांकडूनही चुका होतात. मात्र मध्यम मार्ग पत्करणाऱ्यांना सुरक्षेचा धोका कमी असतो. सायबर गुन्हेगारांकडून ७० ते ८० कोटी मलिन सॉफ्टवेअर तयार असून मोबाईलमधील ९० टक्के अ‍ॅप्स हे धोकादायक आहेत व त्यांना अजाणतेपणाने अपलोड करणे म्हणजे सुरक्षेशी तडजोड केल्यासारखे आहे. मोफत काहीच नसते व त्यामुळे कधीकधी खूप मोठी किंमत मोजावी लागते. त्यामुळे मोबाईलपेक्षा आपल्या संगणकारवर ऑनलाईल व्यवहार करा, असा सल्ला त्यांनी दिला.बँक सुरक्षेच्या दृष्टीने काम करीत असते, आपल्याला चुका टाळायच्या आहेत. ऑनलाईन व्यवहार करताना प्रमाणित साईट्सचाच वापर करो, संगणकावर दिसणाऱ्या कुकीज किंवा इतर सॉफ्टवेअरवर नाहक जाण्याचा प्रयत्न करू नका. या कुकीज तुमच्याबद्दलची माहिती गोळा करण्याच्याच प्रयत्नात असतात. तुमच्या व्यवहाराची नोंद एकतर मेंदूत किंवा स्वतंत्र डायरीत करून ठेवा. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा अकाऊंटची माहिती बँक कधीही फोनवर मागत नाही. बँकेच्या नावाने गळ टाकून तुमची माहिती घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे अशा फोनने घाबरून जाऊ नका व कुठलीही माहिती देऊ नका. भावनिकतेत पासवर्ड ठेवू नका, तो जेवढा किचकट ठेवता येईल तेवढा प्रयत्न करा आणि काही महिन्यांनी तो बदलत राहा. सार्वजनिक वायफायचा उपयोग करून वैयक्तिक आणि व्यावहारिक माहितीचे आदानप्रदान करू नका.बँक खाते एकापेक्षा अधिक ठेवा व कमी डिपॉझिट असलेल्या खात्यातून व्यवहार करण्याचा प्रयत्न करा. आपल्या संगणकामध्ये घुसखोरी तर झाली नाही ना, याबाबत वारंवार तपासणी करीत राहा, याबाबत मार्गदर्शन करीत कधीही सुरक्षेशी तडजोड करू नका, असे आवाहन त्यांनी केले.रमेश बोरकुटे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कार्यक्रमात जनमंचचे अध्यक्ष प्रमोद पांडे, उपाध्यक्ष राजीव जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. संचालन रामा खरे यांनी केले.

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमITमाहिती तंत्रज्ञान