शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

हरभरा, रब्बी धान विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी झाली सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 17:46 IST

किमान आधारभूत किंमत खरेदी योजना : नोंदणी करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्करामटेक : सरकारने रब्बी विपणन हंगाम २०२४-२५ साठी किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हरभरा व रब्बी धान खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही धान्यांच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांना आधी ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे असून, या नोंदणीला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी हरभऱ्याच्या विक्रीसाठी २७मार्च ते २५ एप्रिल या ३० दिवसांत, तर रब्बी धानासाठी २ ते ३० एप्रिल या काळात नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी अजय बिसने यांनी केले आहे.

या खरेदी केंद्रांवर रब्बी धानाची खरेदी एमएसपी दराने म्हणजेच २,३०० रुपये प्रतिक्विंटल, तर हरभऱ्याची खरेदी ५,६५० रुपये प्रतिक्विंटल दराने केली जाणार आहे. रामटेक तालुक्यात नोंदणीची सुविधा तालुका खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात करण्यात आली आहे, अशी माहिती संघाचे सचिव प्रशांत बोरकर यांनी दिली. इतर ठिकाणी ही नोंदणी खरेदी केंद्रांवरच केली जाणार आहे. ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेताचा सातबारा, गाव नमुना ६अ, चालू हंगामातील पीकपेरा, सातबारा सामायिक असल्यास इतरांचे आधार क्रमांकासह संमतिपत्र, शेतकऱ्याचा आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक, बैंक खाते क्रमांक या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती सोबत आणणे आवश्यक असल्याचे प्रशांत बोरकर यांनी सांगितले.

नाफेड'द्वारे हरभरा खरेदीनागपूर जिल्ह्यात 'नाफेड'द्वारे हरभरा खरेदी केली जाणार आहे. या खरेदीसाठी नाफेडने काही संस्थांना एजन्ट म्हणून नियुक्त केले आहे. यात रामटेक तालुका खरेदी-विक्री संघाचा समावेश आहे. सध्या हरभऱ्याला खुल्या बाजारात 'एमएसपी'च्या आसपास म्हणजेच ५,४०० ते ५,७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. हा दर सरसकट दिला जात असून, नाफेडच्या केंद्रांवर हरभरा साफ करून व व्यवस्थित सुकवून विकावा लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्यात १७ धान खरेदी केंद्रया योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यात एकूण १७ ठिकाणी थान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. यात मौदा तालुक्यातील धानोली, इजनी, खरडा, निहारवाणी, महादुला व मौदा, रामटेक तालुक्यांतील घोटीटोक, महादुला, रामटेक व हमलापुरी, कुही तालुक्यातील वेलतूर व चिपडी, पारशिवनी तालुक्यातील डुमरी व खेडी, उमरेड तालुक्यातील उमरेड, भिवापूर तालुक्यातील भिवापूर व पांढरवाणी या केंद्रांचा समावेश आहे. या सर्व केंद्रांवर १ एप्रिल ते ३० जून २०२५ या काळात धानाची खरेदी पूर्ण केली जाईल.

टॅग्स :farmingशेतीnagpurनागपूर