उच्च न्यायालयात ४ जुलैपर्यंत ऑनलाईन कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:06 IST2021-06-11T04:06:50+5:302021-06-11T04:06:50+5:30

नागपूर : कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेता, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील ऑनलाईन कामकाजाची मुदत वाढविण्यात आली आहे. आता ...

Online proceedings in the High Court till July 4 | उच्च न्यायालयात ४ जुलैपर्यंत ऑनलाईन कामकाज

उच्च न्यायालयात ४ जुलैपर्यंत ऑनलाईन कामकाज

नागपूर : कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेता, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील ऑनलाईन कामकाजाची मुदत वाढविण्यात आली आहे. आता या न्यायालयात ४ जुलैपर्यंत ऑनलाईन कामकाज होणार आहे. दरम्यान, केवळ तातडीची प्रकरणे ऐकली जातील. यासंदर्भात गुरुवारी नोटीस जारी करण्यात आली.

नोटीसनुसार, १४ जून ते ४ जुलै या कालावधीत न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर हे दिवाणी रिट याचिका, सर्व जनहित याचिका, न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व पुष्पा गणेडीवाला यांचे न्यायपीठ प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्कविषयीचे अर्ज, संदर्भ व अपील्स, लेटर्स पेटेन्ट अपील्स, प्रथम अपील्स, कुटुंब न्यायालय अपील्स, अवमानना अपील्स व याचिका, न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर हे फौजदारी अपील्स, फौजदारी रिट याचिका, न्या. स्वप्ना जोशी या द्वितीय अपील्स, सर्व किरकोळ दिवाणी अर्ज, न्या. रोहित देव हे फौजदारी रिट याचिका, सीआरपीसी कलम ४८२ अंतर्गतचे अर्ज, न्या. मनीष पितळे हे दिवाणी रिट याचिका, दिवाणी रिव्हिजन अर्ज, न्या. श्रीराम मोडक हे प्रथम अपील्स, अपील्स अगेन्स्ट ऑर्डर, न्या. विनय जोशी हे नियमित जामीन अर्ज, २०११ पर्यंतच्या फौजदारी अपील्स, सर्व फौजदारी रिव्हिजन अर्ज तर, न्या. नितीन सूर्यवंशी हे २०१२ व त्यापुढील वर्षांतील फौजदारी अपील्स, सीआरपीसी कलम ४०७ अंतर्गतचे अर्ज व अटकपूर्व जामीन अर्जांचे कामकाज पाहतील. कामकाजाची वेळ सकाळी १०.३० ते दुपारी १.३० व दुपारी २.३० ते ४.३० अशी राहील.

Web Title: Online proceedings in the High Court till July 4