लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आदिवासी विद्यार्थ्यांना एकलव्य रेसिडेन्शियल पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशासाठीची होणारी ऑनलाईन परीक्षा कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे रद्द करण्यात आली असून शैक्षणिक वर्ष २०२०-२१ प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या मागील शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्राच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड होणार आहे, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डिगांबर चव्हाण यांनी कळविले आहे.एकलव्य रेसिडेन्शियल स्कूलमध्ये प्रवेशासाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या कार्यक्षेत्रातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता पाचवी ते नववीमध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जमातीचे विद्यार्थी ज्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत त्यांच्या मागील सत्रातील गुणाच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड होणार आहे.अर्ज भरतेवेळी आवेदन पत्रामध्ये दिलेला मोबाईल क्रमांक जन्मतारीख, विद्यार्थ्यांच्या मागील इयत्तेच्या प्रथम सत्राच्या गुणपत्रिकेची प्रत आवश्यक आहे. शाळेतील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र भरले असतील तर प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती स्वतंत्र भरणे व गुणपत्रक स्वतंत्र अपलोड करणे आवश्यक आहे.
‘एकलव्य’ स्कूल प्रवेशासाठी होणारी ऑनलाईन परीक्षा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 20:37 IST
आदिवासी विद्यार्थ्यांना एकलव्य रेसिडेन्शियल पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशासाठीची होणारी ऑनलाईन परीक्षा कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे रद्द करण्यात आली असून शैक्षणिक वर्ष २०२०-२१ प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या मागील शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्राच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड होणार आहे, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डिगांबर चव्हाण यांनी कळविले आहे.
‘एकलव्य’ स्कूल प्रवेशासाठी होणारी ऑनलाईन परीक्षा रद्द
ठळक मुद्देमागील शैक्षणिक वर्षाच्या गुणांच्या आधारेच मिळणार प्रवेश