शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन कुलर विक्रीची मोठ्या व्यापाऱ्यांना सूट, छोट्यांना बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 23:14 IST

शहरामध्ये केवळ मोठ्या व्यापाऱ्यांना ऑनलाईन कुलर विक्रीची सूट देण्यात आली आहे. लहान व्यापाऱ्यांना ऑनलाईन कुलर विकण्यास मनाई करण्यात आली आहे. महानगरपालिकेचा हा निर्णय भेदभावपूर्ण आहे, असा आरोप महात्मा फुले मार्केटमधील व्यापाऱ्यांनी केला आहे.

ठळक मुद्देमनपाची भेदभावपूर्ण वागणूक : महात्मा फुले मार्केटमधील व्यापाऱ्यांचा आरोप

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शहरामध्ये केवळ मोठ्या व्यापाऱ्यांना ऑनलाईन कुलर विक्रीची सूट देण्यात आली आहे. लहान व्यापाऱ्यांना ऑनलाईन कुलर विकण्यास मनाई करण्यात आली आहे. महानगरपालिकेचा हा निर्णय भेदभावपूर्ण आहे, असा आरोप महात्मा फुले मार्केटमधील व्यापाऱ्यांनी केला आहे.महात्मा फुले मार्केट व्यापारी संघानुसार, ऑनलाईन कुलर विक्रीला परवानगी मिळत असल्याची माहिती १५ एप्रिल रोजी मिळाल्यानंतर काही व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अशी परवानगी मिळण्यासाठी निवेदन सादर केले. त्या व्यापाऱ्यांना १७ एप्रिल रोजी बोलावण्यात आले व एक पत्र देऊन मनपा आयुक्तांची परवानगी घेण्यासाठी पाठविण्यात आले. मनपा आयुक्तांना भेटण्यासाठी गेल्यानंतर अतिरिक्त आयुक्त निर्भय जैन यांच्या पीएने त्यांना २० एप्रिल रोजी बोलावले. परंतु, २० एप्रिल रोजी त्यांना मनपा आयुक्तांना भेटू देण्यात आले नाही. तसेच, त्यांना ऑनलाईन कुलर विकण्याची परवानगी दिली जाणार नाही असे सांगण्यात आले.महात्मा फुले मार्केटमधील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, मनपा आयुक्त ज्या प्रमाणे मोठ्या व्यापाऱ्यांना ऑनलाईन कुलर विकण्याची परवानगी देऊ शकतात, त्या प्रमाणे छोट्या व्यापाऱ्यांना परवानगी का दिली जात नाही. ज्या प्रमाणे मोठे व्यापारी नियमांचे पालन करून कुलर विकत आहेत, त्याप्रमाणे महात्मा फुले मार्केटमधील व्यापारीही नियमांचे पालन करून ऑनलाईन कुलर विकतील. त्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांनाही ऑनलाईन कुलर विक्रीची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.ऑनलाईन कुलर विकण्याची परवानगी द्यावीमहात्मा फुले मार्केट येथे विदर्भातील सर्वात मोठे कुलर मार्केट आहे. लॉकडाऊनमुळे हे मार्केट महिनाभरापासून बंद आहे. सध्या कुलर विक्रीचा हंगाम असल्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच, तापमान सतत वाढत असल्यामुळे नागरिकांनाही कुलरची गरज आहे. या परिस्थितीत महात्मा फुले मार्केटमधील व्यापाऱ्यांना ऑनलाईन कुलर विकण्याची त्वरित परवानगी दिली गेली पाहिजे.दीपक शर्मा, सहसचिव, महात्मा फुले मार्केट व्यापारी संघ.

टॅग्स :onlineऑनलाइनnagpurनागपूर