पक्क्या वाहन परवानासाठी ‘आॅनलाईन अपॉर्इंटमेन्ट’

By Admin | Updated: November 30, 2014 00:57 IST2014-11-30T00:57:15+5:302014-11-30T00:57:15+5:30

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) शिकाऊ परवानासाठी आॅनलाईन अपॉर्इंटमेंटची सोय उपलब्ध करून दिली आहे. यामुळे शिकावू उमेदवार आपल्या सोयीनुसार दिवस व वेळ निवडू शकतो.

'Online Appointment' for Poki Vehicle License | पक्क्या वाहन परवानासाठी ‘आॅनलाईन अपॉर्इंटमेन्ट’

पक्क्या वाहन परवानासाठी ‘आॅनलाईन अपॉर्इंटमेन्ट’

आरटीओ : सोमवारपासून सक्ती
नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) शिकाऊ परवानासाठी आॅनलाईन अपॉर्इंटमेंटची सोय उपलब्ध करून दिली आहे. यामुळे शिकावू उमेदवार आपल्या सोयीनुसार दिवस व वेळ निवडू शकतो. सप्टेंबर महिन्यापासून सुरू झालेल्या या योजनेला मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेऊन १ डिसेंबरपासून आरटीओ ग्रामिण, शहर व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (पुर्व) पक्क्या वाहन परवान्यासाठी आॅनलाईनची सक्ती करण्यात आली आहे. शिकाऊ परवानासाठी प्रत्यक्ष हजर राहून मोटार वाहन कायद्यानुसार चाचणी परीक्षा द्यावी लागते. त्यासाठी आरटीओ उमेदवारांची प्रचंड गर्दी होत होती. नागरिकांना तासनतास उभे राहावे लागायचे. त्यामुळे वेळ आणि श्रम वाया जात होता. काही वेळा पूर्ण दिवस वाया जात होता. या सर्व व्यापातून मुक्त होण्यासाठी परिवहन कार्यालयाने आॅनलाईन अपॉर्इंटमेंटची सोय उपलब्ध करून दिली. आरटीओ, शहर व ग्रामीण कार्यालयात १ सप्टेंबरपासून तर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्वमध्ये १७ सप्टेंबरपासून ही पद्धत सुरू झाली. सुरुवातीला याला कमी प्रतिसाद मिळाला, परंतु आठवड्याभरातच चांगला प्रतिसाद मिळू लागला. आता याला घेऊनच सोमवारपासून पक्क्या परवान्यासाठीही हीच पद्धत लागू होणार आहे. या सोयीमुळे उमेदवाराला वाहन चाचणीसाठी आपल्या सोयीनुसार दिवस व वेळ निवड करणे शक्य होणार आहे. उमेदवाराने ६६६.२ं१ं३ँ्र.ल्ल्रू.्रल्ल या संकेत स्थळावर जाऊन ‘इश्यू आॅफ परमनन्ट लायसन्स टू मी’ यावर क्लिक करावे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Online Appointment' for Poki Vehicle License