शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कांदा उत्पादक संकटात; कांद्याला हवा २० रुपये भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 09:49 IST

कांदा खरेदी नाशिक जिल्ह्यासह विदर्भातील अकोला जिल्ह्यात सुरू करावी, अशी मागणी शेतकरी संघटना आणि महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली आहे.

ठळक मुद्देनाफेड करणार नऊ रुपये दराने खरेदी

सुनील चरपेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आठ महिन्यांपूर्वीच्या अतिवृष्टीनंतर राज्यातील नाशिक व अकोला जिल्ह्यात रबीच्या कांद्याचे बंपर उत्पादन झाले. त्यातच कोरोना व सरकारी धोरणांमुळे कांद्याचे घाऊक भाव २१० रुपयांवरून ५ ते ७ रुपयांपर्यंत कोसळले. दरम्यान, केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडील कांदा ९ रुपये प्रति किलो भावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला. शासनाने हा कांदा २० रुपये प्रतिकिलो भावाने खरेदी करावा तसेच कांदा खरेदी नाशिक जिल्ह्यासह विदर्भातील अकोला जिल्ह्यात सुरू करावी, अशी मागणी शेतकरी संघटना आणि महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली आहे.देशातील एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा ३७ टक्के आणि नाशिक जिल्ह्याचा १० टक्के वाटा आहे. सोबतच पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, धुळे व अकोला जिल्ह्यातही कांद्याचे मोठे उत्पादन होते. आॅगस्ट-सप्टेंबर २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील ८५ ते ९९ टक्के कांदा शेतातच सडल्याने एकरी उत्पादन ५ ते १० क्विंटल झाले. त्यामुळे किरकोळ बाजारात कांद्याचे भाव आकाशाला भिडले होते.सामान्य ग्राहकांचे हित लक्षात घेता केंद्र सरकारने सप्टेंबर २०१९ मध्ये कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेत त्यावर लगेच अंमलबजावणी केली. रबी हंगामात कांद्याचे उत्पादन वाढल्याने केंद्र सरकारने ही निर्यातबंदी हटविण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी २६ फेब्रुवारी २०२० रोजी अधिसूचना जारी केली. वाणिज्य मंत्रालयाने या अधिसूचनेला २ मार्च रोजी मंजुरी दिली. प्रत्यक्षात कांद्यावरील निर्यातबंदी १५ मार्चला हटविण्यात आली आणि निर्यात प्रक्रिया सुरू झाली. या काळात नाशिकच्या बाजारपेठेत कांद्याचे भाव १३ ते १६ रुपये प्रतिकिलो होते.या अधिसूचनेमुळे कांद्याचे भाव १९ रुपये प्रतिकिलोपर्यंत चढले होते. भाव वाढल्याने शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा बाजारात आणला. मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने कांद्याचे भाव कमालीचे कोसळले. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून शेतकºयांकडील कांदा ९ रुपये प्रतिकिलो भावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला. वास्तवात, नाफेडने कांदा खरेदीला अद्याप सुरुवात केली नाही. नऊ रुपये प्रतिकिलो भाव परवडण्याजोगा नसल्याने शासनाने २० रुपये प्रतिकिलो भावाने कांदा खरेदी करावा. हा कांदा सामान्य ग्राहकांना वाजवी दरात उपलब्ध होऊ शकतो, अशी माहिती तेल्हारा (जिल्हा अकोला) येथील कांदा उत्पादक तथा शेतकरी संघटनेच्या सोशल मीडिया आघाडीचे राज्य प्रमुख विलास ताथोड आणि महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली.५० हजार टन खरेदीचे उद्दिष्टनाफेड या हंगामात शेतकऱ्यांकडून ५० हजार टन कांदा खरेदी करणार आहे. यात नाशिक जिल्ह्यातील ४५ हजार टन आणि गुजरातमधील ५ हजार टन कांद्याचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात ही खरेदी लासलगाव, पिंपळगाव व कळवण कृ षी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून केली जाणार आहे. नाफेडचे मागील वर्षी ५७ हजार टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट होते.निर्यात व मागणी घटलीकोरोनामुळे हॉटेल्स बंद असल्याने कांद्याची देशांतर्गत मागणी घटली आहे. शिवाय, निर्यातीसाठी पुरेशी जहाजे उपलब्ध नाहीत. कांदा निर्यातीला वातानुकूलित कंटेनरची आवश्यकता असते. कोरोनामुळे कंटेनरला परतीचे भाडे मिळत नाही. त्यामुळे कांदा निर्यातदारांना कंटेनरचे जाणे व परत येण्याचे भाडे द्यावे लागते. ते त्यांना परवडणारे नाही.नाफेडने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडील कांदा शेवटच्या गोणीपर्यंत खरेदी करावा. यावर्षी अकोला जिल्ह्यात सात हजार एकरांमध्ये कांद्याची लागवड केली होती. एकरी १०० ते १५० क्विंटल उत्पादन झाले आहे. हा कांदा साठवून ठेवण्यासाठी अकोला जिल्ह्यात कांदा चाळ नाही. त्यामुळे नाफेडने नाशिकसोबतच अकोला जिल्ह्यात २० रुपये प्रतिकिलो भावाने कांदा खरेदी करावा.- विलास ताथोड,कांदा उत्पादक तथा सोशल मीडिया आघाडी प्रमुख, शेतकरी संघटना, महाराष्ट्र.केंद्र सरकारने सप्टेंबर २०१९ मध्ये कांद्यावर निर्यातबंदी लावली व लगेच अंमलबजावणी केली. ही निर्यातबंदी उठवताना तात्काळ अंमलबजावणी केली नाही. अधिसूचना जारी करणे व निर्यात प्रक्रिया खुली होणे यात २० ते २२ दिवस गेले. सरकारच्या या दिरंगाईमुळे एकीकडे संभ्रम निर्माण झाला तर दुसरीकडे बाजारात आवक वाढली. त्यामुळे भाव कोसळले. आता सरकारने २० रुपये प्रतिकिलो भावाने शेतकऱ्यांकडील कांदा खरेदी करावा.- भारत दिघोळे,अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.

 

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी