शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

नराधमाच्या हातून वाचला एकाचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 00:16 IST

नराधम विवेक अतिशय सनकी स्वभावाचा होता. त्याने काही मनात ठरवले की तो ते पूर्ण करण्यासाठी काहीही करायचा. त्याने आपल्या गावातील एका युवकाचाही जीव घेण्याचे ठरविले होते. परंतु पवनकर हत्याकांड झाल्याने त्या युवकाचा जीव वाचला.

ठळक मुद्देमजूर युवकही होता ‘टार्गेट’ : विवेकने सांगितली ‘पांड्या’ची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नराधम विवेक अतिशय सनकी स्वभावाचा होता. त्याने काही मनात ठरवले की तो ते पूर्ण करण्यासाठी काहीही करायचा. त्याने आपल्या गावातील एका युवकाचाही जीव घेण्याचे ठरविले होते. परंतु पवनकर हत्याकांड झाल्याने त्या युवकाचा जीव वाचला.विवेकची विचारपूस करताना एकेक प्रकरण समोर येत आहे. विवेकच्या महाकाळकर ले-आऊट येथील घरात पोलिसांना एका पोस्टरवर कमलाकरसह पांड्याचे नावही लिहिलेले आढळून आले होते. पोलिसांनी कमलाकरचे कुटुंबीय आणि इतर लोकांना पांड्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी मुलगा कृष्णा ऊर्फ गणेश याला पांड्या म्हणत असावा, असा अर्थ लावला. पोलिसांनी जेव्हा विवेकला याबाबत विचारणा केली, तेव्हा त्याने पांड्या नवरगाव येथे राहत असलेल्या युवकाचे नाव असल्याचे सांगितले. विवेकनुसार पांड्या त्याच्या शेतात मजुरी करीत होता. पांड्यासोबत त्याचे भांडण झाले होते. तेव्हा त्याने पांड्यालाही संपवण्याचा निश्चय केला होता. त्यामुळेच त्याचे नावही पोस्टरवर लिहून ठेवले होते. कमलाकरनंतर पांड्याचाही खून करण्याचा त्याचा विचार होता. परंतु या हत्याकांडानंतर त्याला नागपूर सोडून जाणेच योग्य वाटले. पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही, याचा विवेकला विश्वास होता. त्याला आश्रय देणाऱ्या अंगद नवाच्या युवकाच्या हाती त्याचा मोबाईल लागला नसता तर विवेक आतापर्यंत पोलिसांच्या हातीही आला नसता.विवेकचे म्हणणे आहे की, त्याने केवळ कमलाकरचा खून करण्याचे ठरवले होते. कमलाकरच्या हो मध्ये हो मिळवीत असल्याने तो अर्चनामुळेही दु:खी होता. परंतु तिचा खून करण्याचा त्याने विचार केला नव्हता. विचारपूस करतानाही विवेकला कुठलही पश्चात्ताप होत असल्याचे दिसून येत नाही. त्याचे म्हणणे आहे की, न्यायालयातून निर्दोष सुटून आल्यानंतर पुढचे जीवन व्यवस्थितपणे जगण्यासाठी त्याने प्रयत्न सुरू केले होते. मुलगा कृष्णाला होस्टेलमध्ये टाकण्याचा त्याचा विचार होता. त्याने शेती विकण्याच्या संदर्भात चर्चा करताना एका महिलेशी मुलाच्या होस्टेलबाबत चर्चाही केली होती. त्या महिलेनेही याला दुजोरा दिला आहे. विवेकने शांतिनगर येथील गँगस्टरसह पाच ते सहा लोकांशी शेती विकण्यााबत चर्चाही केली होती.

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर