काँग्रेस नेत्यासह एकाला कामठीतून केली अटक

By Admin | Updated: February 4, 2017 02:53 IST2017-02-04T02:53:57+5:302017-02-04T02:53:57+5:30

भारत - इंग्लंड दरम्यान बुधवारी (दि. १) खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी टष्ट्वेन्टी क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या काँग्रेसच्या स्थानिक नेत्यासह

One person was arrested along with Congress leader | काँग्रेस नेत्यासह एकाला कामठीतून केली अटक

काँग्रेस नेत्यासह एकाला कामठीतून केली अटक

टी - २० क्रिकेट सामन्यावर सट्टा : १० हजारांचा मुद्देमाल जप्त
कामठी : भारत - इंग्लंड दरम्यान बुधवारी (दि. १) खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी टष्ट्वेन्टी क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या काँग्रेसच्या स्थानिक नेत्यासह सट्टा स्वीकारणाऱ्यास जुन्या कामठी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल हॅण्डसेट जप्त करण्यात आले. सट्टा स्वीकारणाऱ्या अन्य दोघांचा शोध सुरू आहे. ही कारवाई शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या दोघांमध्ये सट्टा स्वीकारणारा एतेइयाम ऊर्फ येतू अब्दुल नबी (३२, रा. भाजीमंडी कामठी) व सट्टा लावणारा काँग्रेस नेता मनोज जगदीश शर्मा (४५, जुनी ओळ कामठी) यांचा समावेश आहे. तर सट्टा स्वीकारणारे इमरान व सुभाष दोघेही रा. नागपूर फरार आहेत. भारत - इंग्लंड दरम्यान २८ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान तीन टी टष्ट्वेन्टी क्रिकेट सामने खेळल्या गेले. या तिन्ही सामन्यांवर कामठी शहरात सट्टा लावण्यात व स्वीकारण्यात आल्याची माहिती कामठी (जुनी) ठाण्याचे ठाणेदार जयेश भांडारकर यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. त्यानुसार एतेइयाम यास मोठ्या शिताफीने कामठी शहरातून ताब्यात घेतले आणि त्याच्या मोबाईल फोनची तपासणी केली. त्यातील काही मॅसेजेस व कॉलच्या आधारे मनोज शर्मा याने या सामन्यावर सट्टा लावल्याचे स्पष्ट झाल्याने गुरुवारी रात्री कामठी (जुनी) पोलीस ठाण्यात विचारपूस करण्यासाठी बोलावण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास मनोज शर्माला अटक करण्यात आली. या कारवाईमुळे कामठी शहरात खळबळ उडाली असून, सट्टा स्वीकारणारे व लावणाऱ्यांचे धाबे दणाणले. या प्रकरणी कामठी पोलिसांनी मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)

काँग्रेसच्या बड्या नेत्यावर संशयाची सूई
कामठीत क्रिकेटवर सट्टा लावण्यासह दैनंदिन सट्टापट्टी, अवैध व्यवसायात काँग्रेसच्या स्थानिक बड्या नेत्याचा समावेश असल्याचे सर्वश्रुत आहे. या प्रकरणातही ‘त्या’ नेत्याचा सहभाग असल्याचा संशय असून पोलीस त्या दिशेने तपास करीत आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईलमधील संभाषण हे त्याच्याशीच संबंधित असल्याची माहिती आहे. त्यामुळे त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी ‘फिल्डिंग’ लावली आहे. सोबतच इतर जुनी प्रकरणेही आता उघडली जाणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, या प्रकरणात ‘त्या’ नेत्याला चौकशीसाठी गुरुवारी रात्री पोलीस ठाण्यातही बोलविण्यात आले होते. ही चौकशी रात्री उशिरापर्यंत चालली. या कारवाईमुळे राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मनोज शर्मा सट्ट्यात लिप्त
कामठी शहरात क्रिकेट सामन्यांवर सट्टा स्वीकारला जात असल्याची गुप्त माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे (नागपूर ग्रामीण) तत्कालीन पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी वर्षभरापूर्वी कामठी शहरातील गोकुलधाममधील पॉश बंगल्यावर धाड टाकली होती. त्यात दोन बुकींना अटक करण्यात आली होती. शिवाय, त्यांच्याकडून १० लाख ३३६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. यात मनोज शर्मा लिप्त असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. परंतु, ठोस पुरावे न मिळाल्याने पोलिसांनी त्याला अटक केली नव्हती.


ध्वनिफित आली अंगलट
कामठी शहरातील कोळसाटाल परिसरात तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली, या संदर्भात विचारणा करण्यासाठी एहतेश्याम हा कामठी (जुनी) पोलीस ठाण्यात गेला होता. याच मुद्यावरून त्याचा सहायक पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्याशी वाद उद्भवला होता. त्यामुळे त्याने या संदर्भात तक्रार करण्यासाठी पोलीस उपायुक्त अविनाशकुमार यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. त्याने अविनाशकुमार यांची भेट घेऊन त्याच्या मोबाईलमधील काही व्यावसायिकांचे अवैध धंद्यांबाबतचे संभाषण ऐकविले. अविनाशकुमार यांनी त्याच्या मोबाईलमधील एक जुनी ध्वनीफित ऐकली असता त्यातील आवाज हा एहतेश्याम याचा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ही एक ध्वनीफित त्याच्या अंगलट आली.

Web Title: One person was arrested along with Congress leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.