शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या जनाहारला एक लाखाचा दंड : बालकांना निकृष्ट भोजन पुरविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 22:11 IST

नागपूर रेल्वे स्थानकावरील जनाहार रेस्टॉरंटमधून मुलांना निकृष्ट दर्जाचे भोजन पुरविल्यामुळे मध्य रेल्वे नागपूर प्रशासनाने जनाहारवर एक लाखाचा दंड केला आहे. सोबतच जनाहारमध्ये ड्रेनेज लाईन फुटल्यामुळे ते काम पूर्ण होईपर्यंत जनाहार बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

ठळक मुद्देड्रेनेजचे काम पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूररेल्वे स्थानकावरील जनाहार रेस्टॉरंटमधून मुलांना निकृष्ट दर्जाचे भोजन पुरविल्यामुळे मध्य रेल्वे नागपूर प्रशासनाने जनाहारवर एक लाखाचा दंड केला आहे. सोबतच जनाहारमध्ये ड्रेनेज लाईन फुटल्यामुळे ते काम पूर्ण होईपर्यंत जनाहार बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.मंगळवारी रेल्वे सुरक्षा दलाने बालमजुरांची तस्करी होत असल्यामुळे २६ बालकांना ताब्यात घेतले होते. या मुलांना आरपीएफच्या ठाण्यात आणल्यानंतर त्यांची चौकशी करताना ते उपाशी असल्याचे समजले. त्यांच्यासाठी प्लॅटफार्म क्रमांक १ वरील आयआरसीटीसीच्या जनाहारमधून भोजन मागविण्यात आले होते. परंतु दोन घास खाल्ल्यानंतर मुलांनी भोजनाकडे पाठ फिरविली. भोजन न करण्याचे कारण विचारले असता, त्यांनी त्यातून दुर्गंधी येत असल्याचे सांगितले. त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी भोजनाची तपासणी केली असता, ते निकृष्ट दर्जाचे असल्याचे लक्षात आले. यामुळे जनाहार रेस्टॉरंटमधून प्रवाशांना निकृष्ट दर्जाचे भोजन पुरविण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. ही बाब मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील वाणिज्य विभागाने गंभीरतेने घेतली. बुधवारी जनाहार रेस्टॉरंटचे संचालन करणाऱ्या खासगी कंपनीला एक लाख रुपये दंड करण्यात आला. सोबतच भोजनाची दुर्गंधी येत असल्याचे कारण जाणून घेतले असता, जनाहारमधील ड्रेनेज लाईन फुटल्याचे आढळले. अशास्थितीत ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण होईपर्यंत जनाहार बंद ठेवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांनी दिले.बाटलीबंद पाणी प्रकरणात अहवाल पाठविलाआयआरसीटीसीने दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या बॉटलमध्ये साधे पाणी विकण्यात येत असल्याच्या तक्रारीवर कारवाई करीत, मंगळवारी या गाडीच्या पेन्ट्रीकारमधून पाण्याच्या बॉटलचे ७० बॉक्स जप्त केले होते. या प्रकरणात आयआरसीटीसीसह मध्य रेल्वेच्या वाणिज्य नियंत्रण कक्षाने अहवाल तयार केला आहे. हा अहवाल दक्षिण मध्य रेल्वे, सिकंदराबादला पाठविण्यात आला आहे. या अहवालाच्या आधारे दक्षिण पूर्व रेल्वे पेन्ट्रीकारच्या कंत्राटदारावर कारवाई करणार आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर