सात महिन्यात पोस्टाची एक लाख खाती वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 12:40 PM2020-10-12T12:40:03+5:302020-10-12T12:49:12+5:30

Post Office Nagpur News दुर्गम व नक्षल प्रभावित गडचिरोली विभागात १४२ नवीन पोस्ट ऑफीस सुरु करण्यात आले. त्यामुळे आता एकूण पोस्ट ऑफीसची संख्याही ३६०० वर पोहोचली आहे.

One lakh post office accounts grew in seven months | सात महिन्यात पोस्टाची एक लाख खाती वाढली

सात महिन्यात पोस्टाची एक लाख खाती वाढली

Next
ठळक मुद्देनक्षल प्रभावित भागातही १४२ नवीन पोस्ट ऑफीस

वसीम कुरैशी
नागपूर : कोरोनाच्या संकटादरम्यान सप्टेंबरपर्यंत पोस्ट ऑफीस विभागाने विदर्भात १ लाख खाते उघडले आहे. यासोबतच एकूण खात्यांची संख्या आता ३६ लाखावर पोहोचली आहे. दुर्गम व नक्षल प्रभावित गडचिरोली विभागात १४२ नवीन पोस्ट ऑफीस सुरु करण्यात आले. त्यामुळे आता एकूण पोस्ट ऑफीसची संख्याही ३६०० वर पोहोचली आहे.
विभागाने दुर्गम भागातील ग्रामीणांपर्यंत पैसे काढणे व जमा करण्यासाठी विविध योजनांशी लोकांना जोडण्यासाठी अगोदरपासूनच पाऊल उचलले होेते. याचाच परिणाम म्हणजे एकूण खात्यांमध्ये २ टक्के म्हणजेच तब्बल एक लाख नवीन खााते उघडल्या गेली आहेत, अशी माहिती विदर्भ विभागाचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाय यांनी दिली. भविष्यात पोस्टात लोक पीपीएफ व सिनियर सिटीजन व मासिक आय योजनांचे खातेही उघडता येतील. पोस्टाच्या माध्यमातून टर्म इन्शोरन्सची सुविधाही उपलब्ध केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. यावर्षी नागपूर लोकसभा मतदार संघाअंतर्गत पासपोर्ट सेवा केंद्राच्या माध्यमातून ३१ मार्चपर्यंत ५४ ,९०४ पासपोर्ट अर्ज प्रक्रियेत घेण्यात आले आहेत.

एप्रिलपासून ३० सप्टेंबरपर्यंत झालेले कार्य
३,७२,९९७ आधार लिंक्ड पेमेंट सर्व्हिसच्या माध्यमातून १२१ कोटी ६४ लाख रुपयाचा व्यवहार
नागपूर विभागात आतापर्यंत आयपीपीबी अंतर्गत ७.५० लाख बँक खाते उघडण्यात आले
नागपूर विभागात सुकन्या योजनेंतर्गत २८ गावांना जोडण्यात आले
२१६ गाव विमा ग्राममध्ये सामील करण्यात आले

Web Title: One lakh post office accounts grew in seven months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.