One killed, truck driver injured in road mishap | अपघातात एकाचा मृत्यू, ट्रकचालक जखमी

अपघातात एकाचा मृत्यू, ट्रकचालक जखमी

उमरेड : समाेरून येणाऱ्या अज्ञात भरधाव वाहनाने ट्रकला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या एकाचा मृत्यू झाला, तर ट्रकचालक जखमी झाला. अपघाताची ही घटना उमरेड पाेलीस ठाण्यांतर्गतच्या हेटी शिवारात साेमवारी (दि.१८) रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली.

माेतीराम उईके असे मृताचे नाव असून, सारंग लाेही असे जखमी ट्रकचालकाचे नाव आहे. जखमी ट्रकचालक हा आयशरने (क्र.एमएच ३१ एफसी ३५८१) गडचिराेली येथून नागपूरकडे जात हाेता. दरम्यान हेटी शिवारात समाेरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने ट्रकला धडक दिली. त्यात गंभीररीत्या दुखापत झाल्याने माेतीराम उईके यांचा मृत्यू झाला, तर ट्रकचालक जखमी झाला. याप्रकरणी शुभम ज्ञानेश्वर उईके (२६, रा. ताेंडाखैरी, ता. कळमेश्वर) यांच्या तक्रारीवरून उमरेड पाेलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भादंवि कलम २७९, ३३८, ३०४ (अ), सहकलम १८४, १३४ माेटार वाहन कायद्यान्वये गुन्हा नाेंदविला असून, घटनेचा पुढील तपास पाेलीस हवालदार अरुण जयसिंगपुरे करीत आहेत.

Web Title: One killed, truck driver injured in road mishap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.