ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:42 IST2021-02-05T04:42:20+5:302021-02-05T04:42:20+5:30

खापरखेडा : भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला, तर अन्य एक ...

One killed in truck crash | ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू

ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू

खापरखेडा : भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला, तर अन्य एक गंभीर जखमी झाला. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील वारेगाव (ता. कामठी) शिवारात शुक्रवारी (दि. २२) रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.

महेश काशिराम राऊत (वय २२) असे मृताचे, तर वैभव सिद्धार्थ गजभिये (२२) असे गंभीर जखमीचे नाव असून, दाेघेही बिना संगम, ता. कामठी येथील रहिवासी आहेत. दाेघेही एमएच-४०/एझेड-१७०७ क्रमांकाच्या दुचाकीने वीटभट्टीकडून बिना संगमकडे जात हाेते. त्यातच विरुद्ध दिशेने आलेल्या एमएच-४०/एके-६७१३ क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात दाेघांनाही गंभीर दुखापत झाली असून, दुचाकीचालक महेश राऊतचा नंतर मृत्यू झाला. वैभवला उपचारार्थ नागपूर येथील शासकीय रुग्णालामध्ये भरती करण्यात आले आहे. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी भादंवि २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक निमगडे करीत आहेत.

Web Title: One killed in truck crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.