रस्ते अपघातात एकाचा मृत्यू, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:09 IST2021-07-28T04:09:00+5:302021-07-28T04:09:00+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : वेगात असलेल्या वाहनाने माेटारसायकलला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीवरील दाेघांपैकी एकाचा ...

रस्ते अपघातात एकाचा मृत्यू, एक जखमी
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : वेगात असलेल्या वाहनाने माेटारसायकलला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीवरील दाेघांपैकी एकाचा मृत्यू झाला. ही घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील रामटेक-तुमसर मार्गावरील बाेरी टाेला गावाजवळ शनिवारी (दि. २४) दुपारी घडली.
शंकर रामचंद्र खंडाते (३७, रा. शिरूर, ता. रामटेक) असे मृताचे तर किशोर टेकाम (४२) असे गंभीर जखमीचे नाव आहे. दाेघेही किराणा साहित्य खरेदी करण्यासाठी बाेरी येथे आले हाेते. खरेदी आटाेपल्यानंतर ते एमएच-३१/बीएफ-२८४० क्रमांकाच्या माेटारसायकलने शिरूर येथे जायला निघाले. गावाबाहेरील मुख्य मार्गावर पाेहाेचताच भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या माेटारसायकलला जाेरात धडक दिली.
यात दाेघांनाही गंभीर दुखापत झाली. माहिती मिळताच पाेलिसांनी दाेघांनाही रा.टेक शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आणले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती शंकर खंडाते यांना मृत घाेषित केले तर किशाेरवर उपचाराला सुरुवात केली. या प्रकरणी रा.टेक पाेलिसांनी अशाेक राऊत (रा. परसाेडा, ता. रामटेक) यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भादंवि २७९, ३३८, ३३६, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला. या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक प्रमाेद काेळेकर करीत आहेत.