नागपूर जिल्ह्यात अपघातात पतीसह एक ठार, पत्नी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 03:06 PM2021-06-14T15:06:50+5:302021-06-14T15:08:55+5:30

Nagpur News भरधाव ट्रॅक्टरने माेटरसायकलला जाेरात धडक दिली, त्यात दुचाकीवरील पती व अन्य एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना नागपूर जिल्ह्यात खापा (ता. सावनेर) शिवारात साेमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

One killed, one injured in Nagpur district | नागपूर जिल्ह्यात अपघातात पतीसह एक ठार, पत्नी जखमी

नागपूर जिल्ह्यात अपघातात पतीसह एक ठार, पत्नी जखमी

Next
ठळक मुद्देट्रॅक्टरची माेटरसायकलला धडककाेदेगाव शिवारातील घटना

लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :  भरधाव ट्रॅक्टरने माेटरसायकलला जाेरात धडक दिली, त्यात दुचाकीवरील पती व अन्य एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना खापा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सावनेर-खापा मार्गावरील काेदेगाव (ता. सावनेर) शिवारात साेमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

किसना दुधकवडे (४५, रा. पानउबाळी, ता. कळमेश्वर) व प्रकाश बोरीवार (२२, रा. कान्हादेवी, ता. सावनेर) अशी मृतांची तर शशीकला किसना दुधकवडे रा. पानउबाळी, ता. कळमेश्वर असे गंभीर जखमीचे नाव आहे. तिघेही पारशिवनी तालुक्यात त्यांच्या नातेवाईकाकडे लग्नासाठी गेले हाेते. तिघेही एमएच-४०/बीआर-३०५७ क्रमांकाच्या माेटरसायकलने ट्रिपल सीट पारशिवनी तालुक्यातून खापा मार्गे पानउबाळीला परत जात हाेते.

दरम्यान, काेदेगाव शिवारातील वळणावर काेदेगाव येथून वेगात आलेल्या एमएच-३१/बीई-८४१० क्रमांकाच्या ट्रॅक्टरने त्यांच्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने किसना व प्रकाशचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर शशीकला गंभीर जखमी झाली. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी दाेन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तर शशीकलाला उपचरासाठी खापा येथील शासकीय रुग्णालयात आणलले. पाेलीस घटनास्थळी दाखल हाेईपर्यंत ट्रॅक्टरचालकाने ट्रॅक्टर साेडून पळ काढला हाेता. याप्रकरणी खापा पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक गणेश झांबरे करीत आहेत.

Web Title: One killed, one injured in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात