कारच्या धडकेत एक ठार, एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:05 IST2020-12-28T04:05:37+5:302020-12-28T04:05:37+5:30

कुही : वेगात जाणाऱ्या कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला तर एक ...

One killed, one injured in car crash | कारच्या धडकेत एक ठार, एक जखमी

कारच्या धडकेत एक ठार, एक जखमी

कुही : वेगात जाणाऱ्या कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना वेलतूर (ता. कुही) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील देवळी (खुर्द) शिवारात घडली.

अशाेक साठकर असे मृताचे नाव असून जखमीचे नाव कळू शकले नाही. ते दाेघेही राजाेला, ता. कुही येथील रहिवासी आहेत. ते एमएच-३१/डीएस-७७५३ क्रमांकाच्या माेटरसायकलने राजाेलाहून कुहीला जात हाेते. दरम्यान, देवळी (खुर्द) शिवारात विरुद्ध दिशेने येणाऱ्या एमएच-३१/सीआर-३७०४ क्रमांकाच्या कारने त्यांच्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात दाेघेही गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून दाेघांनाही कुही येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर त्यांना नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती अशाेक साठकर यांना मृत घाेषित केले. याप्रकरणी वेलतूर पाेलिसांनी कारचालक संजय अतकरी, रा. कुही याच्याविरुद्ध भादंवि २७९, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार सुरपाम करीत आहेत.

Web Title: One killed, one injured in car crash