कारच्या धडकेत एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:09 IST2020-12-02T04:09:11+5:302020-12-02T04:09:11+5:30
रामटेक : अज्ञात कारचालकाने दुचाकीला जाेरदार धडक दिली. त्यात दुचाकीवर मागे बसलेल्या एकाचा मृत्यू झाला. अपघाताची ही घटना रामटेक ...

कारच्या धडकेत एकाचा मृत्यू
रामटेक : अज्ञात कारचालकाने दुचाकीला जाेरदार धडक दिली. त्यात दुचाकीवर मागे बसलेल्या एकाचा मृत्यू झाला. अपघाताची ही घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील कांद्री मनसर परिसरात रविवारी (दि.२९) सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.
दशरथ बकाराम राऊत (३५, रा. कैची माईन) असे मृताचे नाव आहे. फिर्यादी सचिन सुधाकर शनिवारे (३५, रा. नंदनवन, नागपूर) व दशरथ राऊत हे दाेघेही आपल्या दुचाकीने नागपूरकडे जात हाेते. दरम्यान, कांद्री मनसर शिवारात अज्ञात पांढऱ्या रंगाच्या कारचालकाने त्यांच्या दुचाकीला समाेरून धडक दिली. त्यात दुचाकीवर मागे बसलेल्या दशरथला गंभीररीत्या दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी भादंवि कलम २७९, ३३८, ३०४ (अ) अन्वये अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा नाेंदविण्यात आला असून, आराेपीचा शाेध सुरू केला आहे. या घटनेचा तपास महिला पाेलीस उपनिरीक्षक बारंगे करीत आहेत.