कन्हान नदीत बुडून एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:09 IST2021-05-26T04:09:05+5:302021-05-26T04:09:05+5:30

कामठी : साेनेगाव राजा शिवारातील कन्हान नदीत बुडून एकाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.२५) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ...

One drowned in the Kanhan River | कन्हान नदीत बुडून एकाचा मृत्यू

कन्हान नदीत बुडून एकाचा मृत्यू

कामठी : साेनेगाव राजा शिवारातील कन्हान नदीत बुडून एकाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.२५) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

नामदेव हिरामण शेंडे (४५, रा.साेनेगाव राजा, ता.कामठी) असे मृताचे नाव आहे. नामदेव शेंडे हे साेमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास शाैचास जात असल्याचे सांगून घराबाहेर गेले हाेते. रात्र हाेऊनही ते घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शाेध घेतला. मात्र, ते कुठेही आढळून आले नाही. दरम्यान, मंगळवारी सायंकाळच्या सुमारास कन्हान नदीपात्रात त्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. याबाबत माैदा पाेलिसांना सूचना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच, पाेलीस हवालदार प्रशांत काळे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथे पाठविला. या प्रकरणी माैदा पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली असून, तपास सुरू केला आहे.

Web Title: One drowned in the Kanhan River