दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:09 IST2021-02-11T04:09:59+5:302021-02-11T04:09:59+5:30

उमरेड : रानडुकरांचा कळप अचानक समाेर आल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीचा अपघात झाला. त्यात गंभीर जखमी झाल्याने दुचाकीवर मागे ...

One dies in two-wheeler accident | दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू

दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू

उमरेड : रानडुकरांचा कळप अचानक समाेर आल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीचा अपघात झाला. त्यात गंभीर जखमी झाल्याने दुचाकीवर मागे बसलेल्या एकाचा मृत्यू झाला. ही घटना २३ जानेवारी राेजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.

बाळकृष्ण झिंगरू शेरकी असे मृत व्यक्तीचे नाव असून, संताेष हरी डावे (३०, रा. नांद, ता. भिवापूर) असे दुचाकीचालकाचे नाव आहे. संताेष डावे हा मृत बाळकृष्ण शेरकी यांच्यासह एमएच-४०/एव्ही-८४७९ क्रमांकाच्या दुचाकीने उमरेड येथून नांद येथे जात हाेते. दरम्यान, सिल्लेपार शिवारात अचानक रानडुकरांचा कळप समाेर आल्याने संताेषचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव दुचाकी स्लिप हाेऊन दाेघेही पडले. त्यात गंभीर दुखापत झाल्याने बाळकृष्ण शेरकी यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पाेलीस हवालदार अजितसिंग ठाकूर यांच्या तक्रारीवरून उमरेड पाेलीस ठाण्यात गुन्हा नाेंदविला असून, तपास सहायक पाेलीस निरीक्षक राजीव लाेले करीत आहेत.

Web Title: One dies in two-wheeler accident