विहिरीत पडून एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:09 IST2021-02-08T04:09:21+5:302021-02-08T04:09:21+5:30

काटाेल : विहिरीत पडून एकाचा मृत्यू झाला. ही घटना काटाेल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील थाटूरवाडा शिवारात नुकतीच घडली असून, शनिवारी ...

One died after falling into a well | विहिरीत पडून एकाचा मृत्यू

विहिरीत पडून एकाचा मृत्यू

काटाेल : विहिरीत पडून एकाचा मृत्यू झाला. ही घटना काटाेल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील थाटूरवाडा शिवारात नुकतीच घडली असून, शनिवारी (दि. ६) सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

रवींद्र गुलाबराव काळमेघ (४७, रा. थाटूरवाडा, ता. नरखेड) असे मृताचे नाव आहे. ते शुक्रवार (दि. ५) पासून घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शाेध घेतला. दरम्यान, ते कुठेही आढळून न आल्याने त्यांनी ते बेपत्ता असल्याची पाेलिसात तक्रार नाेंदविली. त्यातच शनिवारी सकाळी थाटूरवाडा शिवारातील काेरड्या विहिरीत आढळून आला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह काटाेल येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणला. ते विहिरीत पडले की उडी घेतली याबाबत कुणालाही माहिती नाही. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास सहायक फाैजदार विजय बारई करीत आहेत.

Web Title: One died after falling into a well