तलावात उडी घेऊन एकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:08 IST2021-07-17T04:08:24+5:302021-07-17T04:08:24+5:30

वाडी : व्यसनाधीनतेमुळे मानसिक स्थिती बिघडलेल्या व्यक्तीने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना वाडी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील डिफेन्स ...

One commits suicide by jumping into a lake | तलावात उडी घेऊन एकाची आत्महत्या

तलावात उडी घेऊन एकाची आत्महत्या

वाडी : व्यसनाधीनतेमुळे मानसिक स्थिती बिघडलेल्या व्यक्तीने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना वाडी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील डिफेन्स अंबाझरी तलावात शुक्रवारी (दि. १६) सकाळी उघडकीस आली.

अरुण प्रभाकर भिवनकर (५५, रा. साेनेगाव निपाणी, ता. नागपूर ग्रामीण) असे मृताचे नाव आहे.

तो गांजाच्या आहारी असून, गुरुवारी (दि. १५) कुणालाही न सांगता घराबाहेर गेला हाेता. रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्याचा शाेध घेतला. परंतु, कुठेही आढळून आला नाही, अशी माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली. दरम्यान, शुक्रवारी सकाळी डिफेन्स अंबाझरी तलावात त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. त्याने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पाेलिसांनी दिली. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह तलावातून बाहेर काढला व उत्तरीय तपासणीसाठी नागपूर शहरातील मेयाे रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी वाडी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.

160721\img-20210716-wa0113.jpg

मृतक फोटो

Web Title: One commits suicide by jumping into a lake