घरगुती कारणावरून एकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:14 IST2021-02-21T04:14:09+5:302021-02-21T04:14:09+5:30

देवलापार : घरगुती कारणावरून एकाने रागाच्या भरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना देवलापार (ता. रामटेक) येथे नुकतीच घडली. ...

One commits suicide for domestic reasons | घरगुती कारणावरून एकाची आत्महत्या

घरगुती कारणावरून एकाची आत्महत्या

देवलापार : घरगुती कारणावरून एकाने रागाच्या भरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना देवलापार (ता. रामटेक) येथे नुकतीच घडली.

नीतेश कवडू बडे (३५, रा. माकडे ले-आऊट, देवलापार, ता. रामटेक) असे मृताचे नाव आहे. नीतेशचे त्याच्या पत्नीसाेबत घरगुती कारणावरून भांडण झाले हाेते. त्यामुळे ती दाेन्ही मुलांना साेबत घेऊन तिच्या माहेरी निघून गेली हाेती. त्यातच घरी कुणीही नसल्याने नीतेशने दुपट्ट्याच्या मदतीने घरी छताला गळफास लावून जीवनयात्रा संपविली. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी पाेलिसांना सूचना देण्यात आली. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. याप्रकरणी देवलापार पाेलिसांनी कवडू बडे (६७, रा. देवलापार) यांच्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नाेंद केली. या घटनेचा पुढील तपास पाेलीस शिपाई संदीप नागाेसे करीत आहेत.

Web Title: One commits suicide for domestic reasons