एका रक्त पिशवीतून तिघांचा जीव वाचतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:11 IST2021-07-14T04:11:13+5:302021-07-14T04:11:13+5:30
नागपूर : अपघातातील जखमी, गंभीर शस्त्रक्रिया, प्रसूती, डायलेसिसवरील रूग्ण, एचआयव्ही, क्षयरोग, कर्करोग, सिकलसेल व थॅलेसेमिआ आजारांच्या रूग्णांसाठी मोठ्या प्रमाणात ...

एका रक्त पिशवीतून तिघांचा जीव वाचतो
नागपूर : अपघातातील जखमी, गंभीर शस्त्रक्रिया, प्रसूती, डायलेसिसवरील रूग्ण, एचआयव्ही, क्षयरोग, कर्करोग, सिकलसेल व थॅलेसेमिआ आजारांच्या रूग्णांसाठी मोठ्या प्रमाणात रक्ताची भरज पडते. कोरोनामुळे रक्तदान शिबिर कमी होत आहेत. रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे. एक पिशवी रक्त दिल्याने तब्बल तीन लोकांचा जीव वाचवता येऊ शकतो. यामुळे रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीचे कार्यकारणी सदस्य हेमंत काळमेघ यांनी येथे केले.
श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीद्वारा संचालित शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्यावतीने काँग्रेसनगर येथील महाविद्यालयाच्या सभागृहात मंगळवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, महाविद्यालयाचे प्राचार्य महेंद्र ढोरे उपस्थित होते. शिबिराच्या आयोजनासाठी महाविद्यालयातील ‘एनएसएस’चे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. पी. एस. उताळे, उपप्राचार्य जी. आर. अपचार, प्रा. आर. एन. देशमुख, प्रा. आर. वाय. देशमुख, प्रा. एन.आर. पांडे, प्रा. ए.डी. बोबडे, प्रा. एस. डब्ल्यू अनवाने, प्रा. आर. एच. महाखोडे, प्रा. शिल्पा गेडाम आदींनी सहकार्य केले. संचालन विद्यार्थी प्रतिनिधी वेदांत चट्टे यांनी केले तर आभार उत्कर्षा खोत यांनी आभार मानले. शिबिरात मोठ्या संख्येत विद्याथी व शिक्षकांनी रक्तदान केले.