शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

१५ ऑगस्टला देशभरातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर होणार देशभक्तीचा सुमधूर जयघोष

By नरेश डोंगरे | Updated: August 14, 2025 00:17 IST

देशाची लोकवाहिनी मानली जाणाऱ्या रेल्वेची धावपळ १२ महिने, ३६५ दिवस सुरू असते. या लेकुरवाळीतून प्रवास करणारी मंडळी जेथून चढतात आणि उतरतात.

नरेश डोंगरे नागपूर : शुक्रवारी १५ ऑगस्टला देशभरातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर देशभक्तीचा सुमधूर जयघोष होणार आहे. अशा प्रकारचा हा कर्णमधूर जयघोष विविध रेल्वे स्थानकांवर पहिल्यांदाच होणार असून आरपीएफचे जवान आपल्या संगीत सादरीकरणातून जनतेच्या हृदयात देशप्रेमाचे स्फुल्लिंग चेतवणार आहेत.देशाची लोकवाहिनी मानली जाणाऱ्या रेल्वेची धावपळ १२ महिने, ३६५ दिवस सुरू असते. या लेकुरवाळीतून प्रवास करणारी मंडळी जेथून चढतात आणि उतरतात. त्या ठिकठिकाणच्या रेल्वे स्थानकावर प्रवाशांनो लक्ष द्या... प्रवाशांनो असे करा... ही काळजी घ्या..., अशा प्रकारचा उद्घोष नेहमीच कानावर पडतो. मात्र, यावेळी १५ ऑगस्ट २०२५ च्या स्वातंत्र्य दिनी विविध प्रांतातील प्रमूख रेल्वे स्थानकांवर यावर्षीपासूनच्या स्वातंत्र्य दिनी देशात एका ऐतिहासिक पर्वाला प्रारंभ होणार आहे. तो म्हणजे, स्वातंत्र्य दिनाच्या गाैरवशाली आणि पारंपारिक कार्यक्रमांसोबतच यंदा देशभक्तीने ओतप्रोत  'ऐ मेरे वतन के लोगो...वंदे मातरम..., सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मे है... आदी सुमधूर गितांच्या माध्यमातून भारत मातेला नमन केले जाणार आहे. देभभक्तीपर गितांसोबतच भारत मातेचा जयघोषही रेल्वे स्थानकांवर होणार आहे. यासाठी  रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) बँडचे ठिकठिकाणचे पथकं सराव करीत आहेत.  महाराष्ट्रासह १२ राज्यात  महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि बांद्रा रेल्वे स्थानकासह देशातील १२ प्रमुख राज्यांतील मुख्य रेल्वे स्थानकांवर हा देशभक्तीपर गितांचा कार्यक्रम घेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्याच्या आयोजनाची जबाबदारी रेल्वेच्या विविध विभागीय कार्यालयांना (डीआरएम) देण्यात आली आहे. त्यासाठी शानदार शामियाना, स्टेज आणि प्रवाशांना बसण्याची व्यवस्था करण्याचेही आदेश देण्यात आले आहे. या स्थानकांवर होणार कार्यक्रम महाराष्ट्रातील मुंबई, बांद्रा, हरियाणातील अंबाला छावणी रेल्वे स्थानकासह राजस्थानमधील जयपूर, पश्चिम बंगालमधील हावडा तसेच सियालदाह, बिहारच्या पाटना, दिल्लीतील हजरत निजामुद्दीन, उत्तर प्रदेशमधील प्रयागराज आणि गोरखपूर, आसामच्या गुवाहाटी, तेलंगणातील हैदराबाद, कर्नाटकमधील हुबळी आणि मध्य प्रदेशातील जबलपूर रेल्वे स्थानकावर देशभक्तीच्या सुरांची ही मैफल सजणार आहे. नागपुरात बँड नाही नागपुरात मध्य रेल्वे तसेच दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अशी आरपीएफची दोन विभागीय कार्यालय आहेत. मात्र त्यांच्यापैकी एकाहीकडे बँड पथक नाही, असे दोन्ही आरपीएफच्या विभाग प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर स्पष्ट झाले. त्यामुळे नागपूर रेल्वे स्थानकावर सिस्टमच्या माध्यमातूनच देशभक्तीचा जागर होईल.