वयोवृद्ध निवृत्त कर्मचाऱ्यांना १० टक्के पेन्शन वाढ

By Admin | Updated: December 4, 2014 00:43 IST2014-12-04T00:43:35+5:302014-12-04T00:43:35+5:30

८० किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या राज्य शासनाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंब निवृत्ती वेतनात (पेन्शन) १० टक्के वाढ करण्यात आली आहे.

Older pensioners get 10 percent pension increase | वयोवृद्ध निवृत्त कर्मचाऱ्यांना १० टक्के पेन्शन वाढ

वयोवृद्ध निवृत्त कर्मचाऱ्यांना १० टक्के पेन्शन वाढ

नागपूर: ८० किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या राज्य शासनाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंब निवृत्ती वेतनात (पेन्शन) १० टक्के वाढ करण्यात आली आहे.
कोषागार कार्यालयाला शासनाकडून आदेश प्राप्त झाले आहेत. १ एप्रिल २०१४ पासून ही वाढ देण्यात येणार आहे. त्यासाठी कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी त्यांच्या वयाचा दाखला (जन्म दिनांकाचा पुरावा, पॅन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मासंंबंधीची उपलब्ध कागदपत्रे) जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करावा, यासंदर्भात अडचणी असेल तर कोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
आयकरासंबंधी सूचना
नागपूर कोषागार कार्यालयांतर्गत येणाऱ्या आयकर पात्र सर्व निवृत्तीवेतन धारकांनी त्यांच्या उत्पन्नाच्या तुलनेत बचत केली असेल तर त्यासंदर्भातील कागदपत्रे झेरॉक्सच्या प्रतीसह कोषागार कार्यालयास तात्काळ सादर करावी,१५ दिवसाच्या आत कागदपत्रे सादर केली नाही तर आयकर कपात केली जाईल. तसेच ज्या निवृत्तीवेतन धारकांनी अद्याप पॅन कार्डची झेरॉक्स प्रत सादर केली नाही त्यांच्या उत्पन्नातून दुप्पट आयकर कपात केली जाईल, असे कोषागार कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.(प्रतिनिधी)
वैद्यकीय प्रतिपूर्ती विमा योजना
शासकीय सेवेतून निवृत्त होण्यास एक वर्ष शिल्लक असलेले व नुकतेच सेवानिवृत्त झालेले अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी वैद्यकीय गट विमा योजना लागू करण्यात येत आहे. गट विमा घेणाऱ्यांना ते स्वत: आमि पत्नी यांना विम्याचे संरक्षण मिळेल. दर तीन वर्षांपर्यंत पॉलिसीचे नुतनीकरण होईल व या दरम्यान निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना या योजनेत सहभागी करून घेतले जाईल. यायोजनेंतर्गत दवाखान्यात भरती झाल्यानंतर उपचारावर होणाऱ्या खर्चाची प्रतिपूर्ती होईल तसेच बाह्य रुग्ण उपचारासाठी विमा छत्र ल ागू राहील. यात वैद्यकीय चाचणीची अट असणार नाही, असे शासनाच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Older pensioners get 10 percent pension increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.