शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

अर्थसंकल्पापूर्वी जुनी पेन्शन; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

By मंगेश व्यवहारे | Updated: December 14, 2023 12:52 IST

सहाय समितीचा अहवाल आला आहे. या अहवालाचे सरकारने वाचन केलेले नाही

नागपूर : जुनी पेन्शनसंदर्भात कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत काल बैठक झाली. त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिव होते. मुख्यमंत्र्यांनी जुनी पेन्शनबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. 

सहाय समितीचा अहवाल आला आहे. या अहवालाचे सरकारने वाचन केलेले नाही. त्यानंतर अहवाल पटलावर ठेवण्यात येईल. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती कर्मचारी संघटनांशी चर्चा करतील. केंद्र सरकारनेदेखील एक अभ्यास समिती गठीत केली आहे. पण, त्यांच्याशी आम्ही लिंकअप करणार नाही. आपल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी, यासाठी सरकार निश्चितपणे सकारात्मक निर्णय घेईल. २०३१-३२ पासून जुनी पेन्शनची अंमलबजावणी होणार आहे. त्यांचे काही मुख्यमंत्र्यांनी निकाली काढले.  कर्मचाऱ्यांचा आग्रह आहे की सरकारने तत्काळ निर्णय घ्यावा. मात्र, आम्ही संप मागे घेण्याचे आवाहन केले असून चर्चेतून यावर तोडगा निघेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. याप्रसंगी त्यांनी पीएचडीबाबत मी जे बोललो त्याचा विपर्यास करण्यात आला. मी त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो. मात्र, काही संशोधक नेत्यांवर पीएचडी करताहेत, असे होऊ नये. पीएचडी करताना विषयाचे गांभीर्य असायला हवे, असे त्यांनी स्पष्ट केले.  

कांदा, इथेनॉलप्रश्नी अमित शहांना भेटणारदूध, कांदा आणि इथेनॉल प्रश्नावर आम्ही काल सहकारमंत्री अमित शहा यांच्यासोबत बोललो. दुधाची पावडर निर्यात करण्याचा निर्णय झाल्यास त्याचा देशभरातील दुध उत्पादकांना मदत होईल, असे सांगितले. तर कांदा आणि इथेनॉलबाबत १६ला आम्ही भेट घेणार आहोत, असे अजित पवार म्हणाले. 

भुजबळांचा गैरसमज दूर करणारमहाज्योतीला सारथीच्या तुलनेत कमी अनुदान मिळाल्याचा आरोप अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले,‘कालच्या पुरवणी मागण्यांमध्ये सारथी, बार्टी, महाज्योती यांना मोठी तरतूद केली आहे. ती मंजूर पण झाली आहे. राज्यकर्ते कुणीही असले तरी असा भेदभाव करता येत नाही. भुजबळांना काही गैरसमज झाला असल्यास त्यांच्याशी बोलून तो दूर करण्यात येईल. तसेच, त्यांचे म्हणणे बरोबर असल्यास तशी दुरुस्ती करण्यात येईल.’ 

त्यांचे त्यांना विचारानाना, काका, बाबा, अण्णा, बापू कोण काय बोलतात ते मला विचारू नका. ते विरोधीपक्षाचे नेते आहेत, त्यांना बोलावेच लागेल. ते सरकार चांगले काम करतेय असे म्हणणार आहे का, असा असा टोला अजित पवारांनी लगावला. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारnagpurनागपूरBudgetअर्थसंकल्प 2023