वृद्धाचा बळी घेणाऱ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:10 IST2021-05-25T04:10:15+5:302021-05-25T04:10:15+5:30

नागपूर : दोन महिन्यापूर्वी बेदरकारपणे वाहन चालवून एका वृद्धाचा बळी घेणाऱ्या आरोपीचा गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर शोध लावला. कार्तिक ...

Old man's victim arrested | वृद्धाचा बळी घेणाऱ्याला अटक

वृद्धाचा बळी घेणाऱ्याला अटक

नागपूर : दोन महिन्यापूर्वी बेदरकारपणे वाहन चालवून एका वृद्धाचा बळी घेणाऱ्या आरोपीचा गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर शोध लावला. कार्तिक बंसीलाल बोकडे (वय २०) असे आरोपीचे नाव असून, तो लकडगंजमध्ये राहतो. २८ मार्चला रात्री ८.३० च्या सुमारास टेकचंद तुलसीदास लेखवाणी (वय ५७) हे त्यांचा मुलगा मयूर (वय ३५) सोबत दुचाकीने घरी जात होते. वेगात आलेल्या दुचाकी चालकाने टेकचंद यांच्या दुचाकीला जोरदार धडक मारली. त्यामुळे खाली पडून बाप-लेक जखमी झाले. उपचारादरम्यान टेकचंद यांचा मृत्यू झाला. लकडगंज पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आणि आरोपी ॲक्टिव्हा चालकाचा शोध सुरू केला. गुन्हे शाखेच्या युनिट तीननेही समांतर शोध सुरू केला. तब्बल दोन महिन्यानंतर गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी आरोपीचा छडा लावण्यात यश मिळवले. कार्तिक बोकडे

नामक आरोपीला शोधून पोलिसांनी त्याला अटक केली. त्यांची दुचाकीही जप्त केली. पोलीस निरीक्षक संदीपान पवार, सहायक निरीक्षक पवन मोरे, नायक प्रवीण गोरटे, शाम कडू आणि संदीप मावळकर यांनी ही कामगिरी बजावली.

---

Web Title: Old man's victim arrested