वृद्धाचा वैनगंगा नदीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:09 IST2021-05-11T04:09:08+5:302021-05-11T04:09:08+5:30

वेलतूर : वैनगंगा नदीच्या पात्रात मासेमारी करताना वादळामुळे डाेंगा उलटला आणि डाेंग्यातील मासेमाऱ्याचा बुडून मृत्यू झाला. ही धटना वेलतूर ...

An old man drowned in Wainganga river | वृद्धाचा वैनगंगा नदीत बुडून मृत्यू

वृद्धाचा वैनगंगा नदीत बुडून मृत्यू

वेलतूर : वैनगंगा नदीच्या पात्रात मासेमारी करताना वादळामुळे डाेंगा उलटला आणि डाेंग्यातील मासेमाऱ्याचा बुडून मृत्यू झाला. ही धटना वेलतूर (ता. कुही) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील जीवनापूर शिवारात नुकतीच घडली.

प्रल्हाद भिकाजी शिवरकर (६५, रा. जीवनापूर पुनर्वसन, ता. कुही) असे मृताचे नाव आहे. ते जीवनापूर शिवारातील वैनगंगा नदीच्या पात्रात नेहमीच मासेमारी करायला जायचे. दरम्यान, शुक्रवारी (दि. ७) दुपारी डाेंग्यात बसून ते मासेमारी करीत असताना वादळामुळे त्यांचा डाेंगा उलटला आणि ते डाेंग्यासह पाण्यात बुडाले. त्यानंतर कुटुंबीयांनी पाेलिसांना सूचना देऊन त्यांचा शाेध सुरू केला. रविवारी (दि. ९) सकाळी त्यांचा मृतदेह शाेधून काढण्यात पाेलिसांना यश आले. याप्रकरणी वेलतूर पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, या घटनेचा तपास पाेलीस नाईक स्वाती लाेखंडे करीत आहेत.

Web Title: An old man drowned in Wainganga river