दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:08 IST2021-04-17T04:08:25+5:302021-04-17T04:08:25+5:30
कळमेश्वर : भरधाव माेटारसायकलने जाेरात धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या ...

दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
कळमेश्वर : भरधाव माेटारसायकलने जाेरात धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील कळमेश्वर-काटाेल मार्गावरील घाेगली (ता. कळमेश्वर) शिवारात नुकतीच घडली.
गाेविंद चिरकुटराव हेलाेंडे (७४, रा. खापरी-काेटे, ता. कळमेश्वर) असे मृताचे नाव आहे. ते घाेगली शिवारात राेडच्या कडेने पायी जात हाेते. दरम्यान, वेगात आलेल्या एमएच-४०/बीपी-३६५४ क्रमांकाच्या माेटारसायकलने जाेरात धडक दिल्याने त्यांच्या डाेके व मानेला गंभीर दुखापत झाली. कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमाेपचार केल्यानंतर त्यांना नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी दुचाकीचालक वैभव ढाेके, रा. साेनेगाव याच्याविरुद्ध भादंवि २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास सहायक फाैजदार वानखेडे करीत आहेत.