शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकने आजाेबासह नातवाला उडविले; सून गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2022 12:57 IST

ते कामठी शहरातील हैदरी चाैकात पाेहाेचताच विरुद्ध दिशेने वेगात जाणाऱ्या टिप्परने त्यांच्या ॲक्टिव्हाला जाेरात धडक दिली.

ठळक मुद्देकामठी शहरातील अपघात

कामठी (नागपूर) : डाेळ्यांची तपासणी करण्यासाठी कामठी शहरातील नेत्रतज्ज्ञांकडे जात असलेल्या सेवानिवृत्त पाेलीस अधिकाऱ्याच्या ॲक्टिव्हाला विरुद्ध दिशेने वेगात आलेल्या टिप्परने जाेरात धडक दिली. त्यात या आजाेबांसह तीनवर्षीय नातवाचा मृत्यू झाला, तर सून गंभीर जखमी झाली. हा अपघात कामठी शहरातील हैदरी चाैकात मंगळवारी (दि. ३) दुपारच्या सुमारास घडला.

मृतांमध्ये आजाेबा रामदास परसराम वनकर (६५) व नातू त्रिशांत राकेश वनकर (३) या दाेघांचा समावेश असून, या अपघातात सून दामिनी राकेश वनकर (४५) या गंभीर जखमी झाल्या. वनकर कुटुंबीय गजानन नगर, पिपळा फाटा, नागपूर येथील रहिवासी आहेत. रामदास वनकर यांना त्यांच्या डाेळ्यांची तपासणी करायची असल्याने ते सून दामिनी व नातू त्रिशांत यांना साेबत घेऊन ॲक्टिव्हाने कामठी शहरातील नेत्रतज्ज्ञाकडे येत हाेते. ते कामठी शहरातील हैदरी चाैकात पाेहाेचताच विरुद्ध दिशेने वेगात जाणाऱ्या टिप्परने त्यांच्या ॲक्टिव्हाला जाेरात धडक दिली. या धडकेमुळे ॲक्टिव्हावर मागे बसलेल्या दामिनी दूर फेकल्या गेल्याने गंभीर जखमी झाल्या, तर रामदास व त्रिशांत टिप्परच्या चाकाखाली आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघात हाेताच नागरिकांनी टिप्परचालक जितेंद्र अमरकथक भोंगाडे (२४, रा. सालई बु., ता. मोहाडी, जिल्हा भंडारा) याला पकडून ठेवले. पाेलीस घटनास्थळी दाखल हाेताच त्याला पाेलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी कामठी पाेलिसांनी भादंवि ३०४ (अ), २७९ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

रेती वाहतुकीचा टिप्पर व दगडफेक

रामदास वनकर हे सेवानिवृत्त पाेलीस अधिकारी हाेते, तर त्यांचा मुलगा राकेश हा सैन्यात गुवाहाटी (आसाम) येथे नाेकरीला आहे. राकेश यांचा मुलगा त्रिशांत व पत्नी दामिनी त्यांच्या वडिलांकडे राहायचे. अपघाताला कारणीभूत ठरलेला टिप्पर कुरखेडा, ता. तुमसर, जिल्हा भंडारा येथून रेती घेऊन कामठी शहरात आला हाेता. रेती खाली केल्यानंतर चालक परतीच्या प्रवासाला निघाला हाेता. अपघात हाेताच नागरिकांनी टिप्परवर दगडफेक केली. पाेलीस वेळीच घटनास्थळी आल्याने परिस्थिती चिघळली नाही.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू