शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

बापरे ! दर वर्षी इतके सारे घटस्फोट ? घटस्फोटाची कारणे काय?

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: June 16, 2025 12:52 IST

Nagpur : घटस्फोटाची संख्या का वाढत आहे?

नागपूर : वाचून धक्का बसेल, पण हे खरे आहे. नागपूर कुटुंब न्यायालयामध्ये घटस्फोटाच्या तेराशेवर याचिका दरवर्षी मंजूर होत आहेत. २०२१ ते २०२४ या चार वर्षांमध्ये नागपूर कुटुंब न्यायालयाने घटस्फोटाच्या ५ हजार ५६९ याचिका निकाली काढल्या. त्यापैकी ५ हजार ४४४ याचिका मंजूर करून याचिकाकर्त्या पती-पत्नीला घटस्फोटासाठी पात्र ठरविण्यात आले. यावर्षी फेब्रुवारीपर्यंत तब्बल १ हजार ८८१ दाम्पत्यांना घटस्फोट देण्यात आले. 

वर्ष - घटस्फोट मंजूर - नामंजूर२०२१ - १२३४ - १३

२०२२ - १३९२ - ३८२०२३ - १४३२ - ३५

२०२४ - १३८६ - ३९ 

घटस्फोटाची कारणे काय?आजच्या काळात सर्वाधिक घटस्फोट आपसी सहमतीने घेतले जातात. तसेच, अनैतिक संबंध व क्रूरतापूर्ण वागणूक या दोन कारणांमुळे होणाऱ्या घटस्फोटांची संख्या मोठी आहे. हिंदू विवाह कायद्यातील कलम १३ अनुसार, अनैतिक संबंध, क्रूरतापूर्ण वागणूक, सलग दोन वर्षांवर काळापासून विभक्त राहत असणे, धर्मांतरण करणे, गंभीर मानसिक आजार, संसर्गजन्य लैंगिक आजार, एखाद्या धार्मिक संप्रदायाची दीक्षा घेऊन प्रपंचाचा त्याग करणे, सात वर्षांवर काळापासून जिवंत असल्याचे ऐकिवात नसणे इत्यादी कारणांमुळे घटस्फोट घेता येतो. तसेच, कलम १३-ब मध्ये आपसी सहमतीने घटस्फोट घेण्याची तरतूद आहे.

घटस्फोटाची संख्या वाढत आहे

वर्तमान काळातील अनेक पती-पत्नी स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभे असतात. त्यामुळे त्यांना कोणत्याही निर्बंधाशिवाय जीवन जगायचे असते. त्यांना तडजोड करायची नसते. अशावेळी वाद विकोपाला गेल्यास ते लगेच वेगळे होण्याला प्राधान्य देतात. परिणामी, घटस्फोटाची मागणी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. न्यायालये वाद झालेल्या दाम्पत्यांचे संसार वाचविण्यासाठी मध्यस्थी, समुपदेशन इत्यादी आवश्यक उपाय करतात. परंतु, बरेचदा समेट घडून येत नाही.

काय म्हणतात विधिज्ञ?अनेक प्रकरणांमध्ये पती-पत्नीला विविध कारणांमुळे एकमेकांसोबत राहणे अशक्य होऊन जाते. त्यामुळे त्यांना घटस्फोट मागावाच लागतो. सुखी भविष्याकरिता यापेक्षा दुसरा योग्य मार्ग त्यांच्याकडे उपलब्ध नसतो. असे घटस्फोट टाळले जाऊ शकत नाही. परंतु, काही प्रकरणांमध्ये क्षुल्लक कारणांवरूनही घटस्फोट मागितले जातात. ही बाब भारतीय विवाह संस्थेकरिता धोकादायक आहे. वाद झालेल्या दाम्पत्याने तडजोड करणे शक्य असल्यास कुटुंबाच्या भविष्याकरिता माघार घेणे आवश्यक आहे.

ॲड. सौरभ राऊत, कुटुंब न्यायालय, नागपूर.

टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालयDivorceघटस्फोट