शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा! कापूर २००० रुपये किलो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 10:47 IST

कापराच्या दराने यंदा विक्रम केला असून दर आकाशाला भिडले आहेत. दर ऐकूनच भाविकांच्या अंगात कापरे भरत आहे.

ठळक मुद्देसाधा १७०० रुपये किलो, भक्तांना महागाईची झळकच्च्या मालाची आवक कमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सणासुदीत आणि कोरोनाच्या काळात कापराची मागणी दुप्पट झाली आहे. कापराच्या दराने यंदा विक्रम केला असून दर आकाशाला भिडले आहेत. दर ऐकूनच भाविकांच्या अंगात कापरे भरत आहेत. कोरोना महामारीच्या काळात कच्च्या मालाची आवक कमी असल्याने उत्पादनाची किंमत वाढली आहे. सध्या तरी भाव कमी होण्याची शक्यता नसून दिवाळीनंतर कमी होणार असल्याचे मत उत्पादकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

देशात कापूर उत्पादनासाठी कच्च्या मालाचा पुरवठा करणाऱ्या चार मोठ्या कंपन्या आहेत. सध्या कोरोना महामारीमुळे कच्च्या मालाचा पुरवठा ५० टक्के चआहे. याशिवाय चीनमधून होणारी आयात थांबली आहे. त्यामुळे निर्मिती खर्च वाढला आहे. सध्या उत्पादनाच्या तुलनेत मागणी वाढली आहे. याशिवाय कोरोना काळात सोशल मीडियावर कापराच्या होणाºया प्रचारामुळे प्रत्येक जण खरेदी करीत आहे. याशिवाय गणेशोत्सवामुळे मागणी वाढली आहे. तीन महिन्यांपासून साधा किंवा कापºयाच्या वड्यांची (पॅकिंग टॅबलेट) किंमत ठोकमध्ये प्रति किलो ८०० ते ९०० रुपये होती. आता भाव १२०० ते १३०० रुपयांवर पोहोचला आहे. त्यात ४०० रुपयांची वाढ झाली आहे. किरकोळमध्ये १७०० ते १८०० हजार रुपयांपर्यंत किंमत आहे. साध्या किंवा वड्याच्या कापराची पॅकिंगमध्ये विक्री होते.भीमसेनी किंवा दगड्या कापराच्या किमतीत प्रचंड वाढविदर्भात दगड्या (देशी) आणि पश्चिम महाराष्ट्रात भीमसेनी नावाने प्रचलित कापराची किंमत चार महिन्यात ४०० रुपयांनी वाढली असून ठोक बाजारात प्रति किलो १३५० ते १४०० रुपये दर आहेत. किरकोळमध्ये २ हजार रुपयांत विक्री सुरू आहे. कोरोनाच्या काळात आरोग्यासाठी उत्तम आणि सर्दी व खोकल्यावर घरगुती उपाय म्हणून या कापराला मागणी आहे. याशिवाय घरातील वातावरण स्वच्छ ठेवण्यासाठी हा कापूर जाळला जात आहे. या कापराची विक्री वाढल्याने दर वाढल्याचे उत्पादकांनी सांगितले.

व्यापारी म्हणाले, नागपुरात १३ ते १४ कापूर उत्पादक आहेत. येथून छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, खान्देश, मराठवाडा या भागात विक्रीसाठी पाठविला जातो. छत्तीसगड व मध्य प्रदेशात देवी-देवतांची आरती कापूर जाळून केली जाते. त्यामुळे या राज्यांमध्ये सर्वाधिक विक्री होते. गणेशोत्सव आणि नवरात्रात कापराची मागणी राहणार आहे.

का वाढताहेत दर :- मागणीच्या तुलनेत कच्च्या मालाचा कमी पुरवठा- उत्पादन कमी, मागणी जास्त- कोरोना काळात आयुर्वेदिक उपाय म्हणून मागणीत वाढ

कच्च्या मालाची किंमत वाढल्याने गेल्या तीन वर्षांपासून कापराचे दर वाढतच आहेत. मागणी वाढल्याने सध्या भाव कमी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे ग्राहकांना जास्त भाव चुकते करूनच खरेदी करावी लागत आहे. नवरात्रोत्सवात मागणी वाढणार आहे. दिवाळीनंतर भाव कमी होतील.-नीलेश सूचक, कापूर उत्पादक़

 

टॅग्स :Healthआरोग्यmedicineऔषधं