सोमवारी उपराजधानीत दिवसभर पावसाची संततधार कायम होती. सातत्याने पाऊस येत असल्यामुळे शहरातील अनेक सखल भाग तसेच रस्त्यांवर पाणी साचल्याचे दिसून येत होते. दिवसभरात शहरात ४१.६ मिमी पावसाची नोंद झाली.
उपराजधानीत श्रावणसरींची संततधार : दिवसभरात ४१ मिमी पाऊस
ठळक मुद्देसखल भागात साचले पाणी, आजदेखील अतिवृष्टीचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोमवारी उपराजधानीत दिवसभर पावसाची संततधार कायम होती. सातत्याने पाऊस येत असल्यामुळे शहरातील अनेक सखल भाग तसेच रस्त्यांवर पाणी साचल्याचे दिसून येत होते. दिवसभरात शहरात ४१.६ मिमी पावसाची नोंद झाली. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार शुक्रवारी शहरात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. गुरुवारी सकाळपासूनच नागपूर व आजूबाजूच्या परिसरात पावसाला सुरुवात झाली. दुपारच्या सुमारास पावसाचा जोर जास्त वाढल्याचे दिसून आले. सकाळी ८.३० पर्यंत शहरात २.६ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर सायंकाळी ५.३० पर्यंत शहरात ४१.६ मिमी पाऊस पडला. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार येत्या २४ तासात शहरात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. यादृष्टीने प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, दिवसभर पडणाऱ्या पावसामुळे वातावरणातदेखील थंडावा निर्माण झाला होता. शहरात कमाल २५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सरासरीहून हे तापमान पाच अंशानी कमी होते. तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. अनेक वस्त्या जलमयशहरातील अनेक वस्त्या संततधार पावसामुळे जलमय झाल्या. यात मनीषनगर, आरटीओ सोसायटी, सूरज सोसायटी, पंचतारा सोसायटी, सोनेगावचा काही भाग, नाल्याकाठच्या वस्त्या यांचा समावेश होता. तर न्यू सोमलवाड्याहून रेल्वे ओव्हरब्रीजकडे जाणारा मार्ग, बेलतरोडी मार्ग, नरेंद्रनगर पुलाखाली, लोखंडी पुलाखाली पाणी साचले होते. मेडिकल चौक ते क्रीडा चौक मार्ग तसेच सतरंजीपुरा झोनच्या बाजूला झाडदेखील पडले.खोदकामाचा फटकाशहरात बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने अनेक ठिकाणी चौकात व रस्त्यांवरच पाणी तुंबल्याचे चित्र होते. यशोधरानगर येथे रस्त्यावर तुंबलेले पाणी संजीवनी क्वॉर्टर्समध्ये शिरले. मेडिकल चौक, बजाजनगर चौक, हुडकेश्वर, बैद्यनाथ चौक येथेदेखील पाणी तुंबल्याचे दिसून आले.मोठ्या अपघाताचा धोकाप्रतापनगर सिमेंट मार्गावर रस्त्याच्या कडेला खोदकाम करण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून खोदकाम झाले असून अंतर्गत विद्युतवाहिनी टाकण्यात आलेली नाही. पावसामुळे बाजूला असलेल्या मातीच्या ढिगातील माती रस्त्यावर आली आहे. शिवाय पाण्याचा निचरादेखील होण्यास अडचण येत आहे. यामुळे येथे मोठा अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. शहरातील अनेक मार्गांवर असेच चित्र आहे.