शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

लाड-पागे भरतीत अधिकारी घेतात लाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:58 AM

महापालिकेत लाड- पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या अनुकंपावरील भरतीत महापालिकेचे अधिकारी लाच घेतात. यात आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचाही सहभाग आहे. अशा अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी महापालिकेच्या विधी समितीचे सभापती अ‍ॅड. धरमपाल मेश्राम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्दे मनपा विधी समितीचे सभापती मेश्राम यांचा आरोप: दोषींवर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेत लाड- पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या अनुकंपावरील भरतीत महापालिकेचे अधिकारी लाच घेतात. यात आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचाही सहभाग आहे. अशा अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी महापालिकेच्या विधी समितीचे सभापती अ‍ॅड. धरमपाल मेश्राम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.एखाद्या सफाई कर्मचाऱ्याने आपल्या विवाहित मुलीला वारस बनवून नोकरी देण्याबाबत पत्र दिल्यास, वारस असलेल्या मुलीला आपल्या पालकांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी स्वीकारत असल्याबाबतचे शपथपत्र द्यावे लागते. त्यानंतर संबंधित वारस असलेल्यांना नोकरीत समावून घ्यावे लागते. अशा स्वरूपाचे स्पष्ट निर्देश सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकात आहे. परंतु आरोग्य विभागातील अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार व लाड-पागे समितीचे कामकाज बघणारे राजेश लव्हारे सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकाऐवजी संबंधितांना लाड- पागे समितीसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या परिपत्रकानुसार भरती करतात. अनेक प्रकरणात या विभागाच्या परिपत्रकातील तरतुदी सांगून पात्र उमेदवारांना डावलण्यात येते. लव्हारे यांच्याकडून पैशाची मागणी केली जाते. यात दासरवार यांचाही सहभाग असल्याचा आरोप मेश्राम यांनी केला.सभागृहात २० एप्रिलला लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार नियुक्तीचा प्रश्न निकाली निघाला आहे. असे असतानाही परिपत्रातील तरतुदीचे कारण पुढे करून संभ्रम निर्माण केला जात आहे. हा प्रकार योग्य नाही. सामान्य प्रशासन विभागामार्फत नियुक्त्या केल्या जातात. त्यामुळे या विभागाचे परिपत्रक ग्राह्य धरण्यात यावे, अशी मागणी मेश्राम यांनी केली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर