अधिकाऱ्यांनी घेतला घरकुल याेजनेचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:24 IST2021-01-08T04:24:42+5:302021-01-08T04:24:42+5:30
रामटेक : शासनाच्या महाआवास याेजनेंतर्गत २०१६-१७ मधील शबरी आवास याेजनेतील अपूर्ण घरकुलाचा अधिकाऱ्यांनी आढावा घेतला. गटविकास अधिकारी प्रवीण बमनाेटे ...

अधिकाऱ्यांनी घेतला घरकुल याेजनेचा आढावा
रामटेक : शासनाच्या महाआवास याेजनेंतर्गत २०१६-१७ मधील शबरी आवास याेजनेतील अपूर्ण घरकुलाचा अधिकाऱ्यांनी आढावा घेतला. गटविकास अधिकारी प्रवीण बमनाेटे यांनी तालुक्यातील काचूरवाही गावात भेट देऊन अपूर्ण घरकुलाचे बांधकाम पूर्ण करण्याबाबत लाभार्थ्यांशी संवाद साधला.
गटविकास अधिकारी प्रवीण बमनोटे यांनी घरकुल बांधकाम पूर्ण करण्याकरिता काचूरवाही येथे प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी काचूरवाही येथील लाभार्थी पंचफुला किसन कंगाली, गौरीलाल काेडापे यांना घरकुल पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच तालुक्यात महाआवास अभियान (ग्रामीण) २० नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत राबविले जात आहे. यात तालुक्यातील अपूर्ण घरकुलांचे काम पूर्ण करणे, घरकुलांना १०० टक्के मंजुरी देणे, करारनामा करणे, जागा नसलेल्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे, अतिक्रमण नियमित करणे, आदी कामे वेळेत पूर्ण करणे या संदर्भात माहिती दिली.
यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आर. के. जगने, ग्रामसचिव समाधान वानखेडे व इतर अधिकारी उपस्थित हाेते.