अधिकारी म्हणतात, प्रत्येक मित्र असतो जिवलग

By Admin | Updated: August 2, 2015 03:13 IST2015-08-02T03:13:00+5:302015-08-02T03:13:00+5:30

व्यक्तीच्या जीवनात आईवडील आणि कुटुंब महत्त्वाचे आहे, असे समजले जाते. परंतु मानवाच्या नात्यात एक असे नाते आहे जे खास असते.

The official said, every friend is darling | अधिकारी म्हणतात, प्रत्येक मित्र असतो जिवलग

अधिकारी म्हणतात, प्रत्येक मित्र असतो जिवलग

आशिष दुबे  नागपूर
व्यक्तीच्या जीवनात आईवडील आणि कुटुंब महत्त्वाचे आहे, असे समजले जाते. परंतु मानवाच्या नात्यात एक असे नाते आहे जे खास असते. ते अनेक नात्यांपेक्षा मजबूत आणि विश्वासाचे असते. ते नाते आहे मैत्रीचे. याच कारणामुळे मैत्रीचा पाया भक्कम समजण्यात येतो.
जेव्हा भेटतो तेव्हा मनापासून भेटतो
आजकाल मदर्स डे, फादर्स डे, व्हॅलेंटाईन डे साजरे होतात. माझा या दिवसांवर विश्वास नाही. कारण हे दिवस जेथे नाते संपुष्टात येत आहेत, तेथे साजरे करण्यात येतात. प्रत्येक दिवशी त्यांना आठवणे महत्त्वाचे आहे. मी याचे पालन करतो. माझ्या मित्रांची संख्या खूप मोठी आहे. यात प्राथमिक, माध्यमिक, कॉलेज, उच्च शिक्षण, शासकीय सेवेत आल्यानंतर प्रशिक्षण अकादमीतील मित्रांचा समावेश आहे. या सर्व मित्रात सुब्रत गुप्ता मला सर्वात जवळचे आहेत. ते आमच्या बॅचचे अखिल भारतीय स्तरावरील ४ थे टॉपर होते. आम्ही सोबतच प्रशिक्षण घेतले. सेवेत आल्यानंतरही आमची मैत्री कायम आहे. आम्ही अनेक वर्षानंतर भेटतो तरीसुद्धा आमच्या मैत्रीतील ओलावा कायम आहे. आमच्यात व्हॉट्स अप सारखी मैत्री नाही. व्यक्तीच्या जीवनात मैत्री हे खास नाते असते. हे नाते कठीण प्रसंगी भक्कमपणे पाठीशी उभे राहते. सुब्रत आणि माझे अनेक मित्र आजही काही समस्या असल्यास एकमेकांना मदत करतात.
- अनुप कुमार, विभागीय आयुक्त

मित्रांमुळेच या पदावर आहो
माझ्या जीवनात मित्रांचे महत्त्व खूप आहे. मी आज ज्या पदावर आहो त्यात आईवडिलांसह माझ्या मित्रांचे महत्त्वाचे योगदान आहे. माझे मित्र नसते तर मी आज या पदावर राहिलो नसतो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एक असे नाते असते जे अनेक नात्यांपासून वेगळे आणि महत्त्वाचे असते. कारण जीवनात अनेक बाबी आपण कुटुंबीयांसोबत शेअर करू शकत नाही त्या बाबी फक्त मित्रांसोबत बोलल्या जाऊ शकतात. मित्रच आपल्या समस्येला त्यांची समस्या समजतात. त्या सोबतच ती समस्या दूर करण्यासाठी खांद्याला खांदा लावून आपली साथ देतात. समस्यांचे समाधान करतात. तुम्ही त्यांचा सल्ला ऐकला, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यास तुमच्या सगळ्या समस्या दूर होतात. माझ्या जीवनातही अनेक मित्र आले. आजही ते माझे मित्र आहेत. कोण्या एका मित्राचे नाव घेणे सर्वांसोबत अन्याय करणारे ठरेल. कारण माझ्या जीवनात प्रत्येक मित्राचे योगदान आहे. शाळेपासून आजपर्यंत माझ्या मित्रांनी माझी साथ देताना त्यांचा काय फायदा होईल हा विचार केला नाही. ते फायद्यातोट्याचा विचार न करता माझी मदत करीत राहिले. आजही मी माझ्या मित्रांची मनापासून आठवण करतो.
-डॉ. श्याम वर्धने, नासुप्र सभापती

Web Title: The official said, every friend is darling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.